Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ

पातुर पंचायत समिती

पातुर पं.स.मध्ये दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; ठेकेदारी वाद चिघळला

Patur Panchayat Samiti: पातुर पंचायत समितीमध्ये पेव्हर ब्लॉक कामावरून दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर हाणामारी झाली.


पातुर पंसमध्ये दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी ठेकेदारी वाद चिघळला

Patur Panchayat Samiti |

खेट्रीतील पेव्हर ब्लॉक कामावरून वाद, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पातुर (Patur Panchayat Samiti) : पातुर पंचायत समिती अंतर्गत खेट्री येथे सुरू असलेल्या पेव्हर ब्लॉक कामावरून दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना ३० मार्च रोजी पंचायत समिती कार्यालयात घडली. या घटनेमुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

माहितीनुसार, खेट्री येथे सुरू असलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामात बाहेरील व्यक्ती हस्तक्षेप करत असल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधीकडे करण्यात आली होती. यानंतर संबंधित व्यक्ती पंचायत समिती कार्यालयात येऊन जाब विचारू लागली. या वेळी दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

घटनेदरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचे दरवाजे बंद करून स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित केली. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Patur Panchayat Samiti) घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गजानन तडसे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, घटनेच्या वेळी गटविकास अधिकारी सतीश नायसे अनुपस्थित होते. या प्रकरणी दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

प्रतिक्रिया:
“खेट्री येथे सुरू असलेले पेव्हर ब्लॉकचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती वारंवार गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा विषय आमदारांकडे मांडला. याच कारणावरून वाद झाला.”
-संतोष पाटील, ठाकरे शिवसेना कार्यकर्ते

 

 

Related to this topic: