Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सौरभ साकळे आत्महत्या

कळमनुरी तील पत्रकार सौरभ साकळे यांची आत्महत्या

Saurabh Sakle Suicide: हिंगोलीतील पत्रकार सौरभ साकळे यांनी २७ एप्रिल रोजी आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेमुळे स्थानिक समाजात हळहळ व्यक्त होत आहे, तपास सुरू आहे.


कळमनुरी तील पत्रकार सौरभ साकळे यांची आत्महत्या

Saurabh Sakle Suicide |

हिंगोली (Saurabh Sakle Suicide) : स्थानिक पत्रकार सौरभ धन्यकुमार साकळे (३५) यांनी २७ एप्रिल रोजी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पत्रकार संघाच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की स्थानिक पत्रकार सौरभ साकळे (Saurabh Sakle Suicide) हे २७ एप्रिल सोमवार रोजी सकाळी आपल्या कार्यालयात गेले  काही तासानंतर मित्र त्यांना बोलावण्यास गेला असता कार्यालयाच्या  छताच्या पंख्याला  लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.  घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, जमादार रवी इंगोले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

सौरभ साकळे (Saurabh Sakle Suicide) यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.  मयत सौरभ यांच्या पश्चात आई, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related to this topic: