Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी युवक मृत्यू

परभणीच्या फुलकळस येथे विजेच्या धक्याने युवकाचा मृत्यू...!

Parbhani Youth Death: परभणीच्या फुलकळस येथे माधव वाळवंटे यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. विहिरीवरील मोटार दुरुस्त करताना ही घटना घडली. पोलीस तपास करत आहेत.


परभणीच्या फुलकळस येथे विजेच्या धक्याने युवकाचा मृत्यू

Parbhani Youth Death |

विहिरीवरील मोटार दुरुस्त करताना घडली घटना  ताडकळस पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद

परभणी (Parbhani Youth Death) : ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दितील फुलकळस येथे विजेचा धक्का लागून ३० वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खबर देणारे मयताचे वडील दशरथ रामराव वाळवंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा माधव दशरथ वाळवंटे (वय ३०) हा विहिरीवरील मोटारीचे तुटलेले वायर जोडण्यासाठी गेला होता. शनिवार २५ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजता मोहन सलगर यांच्या शेतात ही (Parbhani Youth Death) घटना घडली. काम करत असताना त्याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. घटनेनंतर नातेवाईकांनी त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

घटनेची (Parbhani Youth Death) माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, बिट जमादार नामदेव सुजलोड, पडोळे व इतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. माधव हा मनमिळावू व मेहनती स्वभावाचा होता. त्याच्या निधनामुळे फुलकळस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरा फुलकळस येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related to this topic: