Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी डिझेल टंचाई

परभणीच्या ताडकळसमध्ये डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा...!

Parbhani diesel shortage: पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे वेगात सुरू असताना ताडकळस येथे डिझेलच्या तुटवड्यामुळे वाहनधारक व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.


परभणीच्या ताडकळसमध्ये डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा

Parbhani diesel shortage |

 

खरीप मशागतीच्या कामांमुळे शेतकऱ्यांची पेट्रोल पंपावर गर्दी

परभणी (Parbhani diesel shortage) : पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे वेगात सुरू असताना ताडकळस येथे डिझेलच्या तुटवड्यामुळे वाहनधारक व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गुरुवारी सकाळी पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळताच पेट्रोल पंपावर तब्बल एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. ग्रामीण भागात नांगरणी, वखरणी, रोटर, सरी मारणे आदी कामे सुरू असल्याने डिझेलची मागणी वाढली आहे.

मात्र पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अनेक पेट्रोल पंपांवर (Parbhani diesel shortage) ‘नो स्टॉक’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. ताडकळस येथील पेट्रोल पंपावर एक दिवसाआड डिझेल व पेट्रोलचा मर्यादित साठा उपलब्ध होत असून प्रशासनासाठी राखीव साठाही ठेवावा लागत आहे. त्यामुळे दोन दिवसांपासूनच वाहनधारक व शेतकरी वाहनांसह रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.