Sibling Accidental Death: परभणी जिल्ह्यातील झरी शिवारात एका भरधाव कारने दुचाकीला धडक देऊन त्यावरील भाऊ व बहीण यांचा मृत्यू झाला. दोघेही गंभीर जखमी होऊन नंतर मृत घोषित करण्यात आले.
परभणी जिल्ह्यातील झरी शिवारात दुचाकी व कारचा अपघात
वटकळी (Sibling Accidental Death) : सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील सख्या बहिणीला घेऊन गावाकडे परत येणार्या दुचाकीला एका भरधाव कारने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील बहिण भावाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील झरी आणि बोरीच्या शिवारात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील शितल महादेव व्यवहारे, (२३) ही परभणी शहरात बी.टेक शाखेत शिक्षण घेत होती. तिला गावाकडे घेऊन जाण्यासाठी भाऊ राम महादेव व्यवहारे (२१) हा परभणीला ७ एप्रिल रोजी आला होता. सकाळी दोघे बहिणभाऊ एमएच - ३८ टी - २२३१ या क्रमांकाच्या मोटार सायकलने गावाकडे परत जात होते. परभणी जिल्ह्यातील झरीपासून जवळच असलेल्या पेट्रोलपंप परिसरात आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एचआर- २० डिएफ - ७८९० या क्रमांकाच्या हुंडई कारने भरधाव धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही बहिण भाऊ गंभीर जखमी (Sibling Accidental Death) झाले. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
मदत कार्यात सहभाग घेत जखमींना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मयत शितल व राम व्यवहारे यांच्या पश्चात आई वडील, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. अपघातात (Sibling Accidental Death) सख्या बहिण भावाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.