Breaking News
  • वाढत्या पेट्रोल दरांचा परिणाम? पेट्रोल चोरीच्या घटनांत वाढ
  • पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन
  • पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे महिलेचा धारधार शास्त्राने वार करून खून
  • इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
  • नंदुरबार बाजार पेठेत गवारची आवक वाढल्याने गवारचे दर अचानक घसरले
  • कल्याणच्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीच्या मुद्द्यावर कल्याणमध्ये राजकारण तापले
  • शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चा
  • नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली महिला रुग्णालय

महिलांचे शासकीय रूग्णालय सज्ज: इमारत ठरतेय शहराचे नवे आकर्षण

Hingoli Women's Hospital: हिंगोलीत एक किमान कोट्यावधी रुपयांचा खर्च करून उभारलेले नवी शासकीय महिला रुग्णालय, जे जुने ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवर बांधले गेले आहे.


महिलांचे शासकीय रूग्णालय सज्ज इमारत ठरतेय शहराचे नवे आकर्षण

Hingoli Women's Hospital |

हिंगोली (Hingoli Women's Hospital) : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवर कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या शासकीय महिला रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असलेली ही भव्य दिव्य इमारत सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असून केवळ उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. 

जिल्ह्यातील महिलांना एकाच छताखाली प्रसूती, स्त्रीरोग, नवजात शिशू काळजी व इतर विशेष उपचार मिळावेत या उद्देशाने या स्वतंत्र महिला रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. जुने ग्रामीण रुग्णालय मोडकळीस आल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. त्यामुळे शासनाने याच जागेवर नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेतला. सदर इमारत तीन मजली असून त्यामध्ये प्रसूती कक्ष, शस्त्रक्रिया गृह, अतिदक्षता विभाग, नवजात शिशू अतिदक्षता कक्ष, बाह्यरुग्ण विभाग, तपासणी केंद्र, औषध भांडार व रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णालयाच्या परिसरात प्रशस्त पार्किंग, रुग्ण नातेवाईकांसाठी प्रतिक्षा कक्ष व हरित क्षेत्राचीही तरतूद आहे.  

या सुसज्ज (Hingoli Women's Hospital) इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. आधुनिक स्थापत्यशैली, आकर्षक रंगसंगती व रात्रीच्या वेळी करण्यात आलेली विद्युत रोषणाई यामुळे ही वास्तू शहरातील एक महत्त्वाचे लँडमार्क ठरत आहे. नागरिकांमध्येही या रुग्णालयाबाबत समाधान व्यक्त होत आहे.  आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावट व वैद्यकीय उपकरणे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच मंत्रिमहोदयांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर हिंगोलीसह शेजारील ग्रामीण भागातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रुग्णालयामुळे माता व बालमृत्यू दर कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related to this topic: