Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

खासदार रामरावजी वडकुते

खासदार रामरावजी वडकुते यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट

MP Ramraoji Vadkute: नवनिर्वाचित खासदार रामरावजी वडकुते यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यात विकास कामांवर सकारात्मक चर्चा झाली.


खासदार रामरावजी वडकुते यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट  

MP Ramraoji Vadkute |

विकास कामांवर झाली सकारात्मक चर्चा, राजकीय वर्तुळात भेटीची चर्चा

हिंगोली (MP Ramraoji Vadkute) : राज्यसभेवर निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित खासदार रामरावजी वडकुते (MP Ramraoji Vadkute) यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी (Nitin Gadkari) यांची सदिच्छा भेट घेतली. खासदारपदी निवड झाल्याबद्दल गडकरी यांनी वडकुते यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व संसदीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मतदारसंघातील प्रलंबित रस्ते, महामार्ग तसेच पायाभूत सुविधांच्या विकासकामांबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. 

राज्यसभेवर निवड झाल्यानंतर वडकुते (MP Ramraoji Vadkute) यांची ही गडकरी यांच्यासोबतची पहिलीच भेट असल्याने राजकीय वर्तुळात या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीमुळे जिल्ह्यातील रखडलेल्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार वडकुते यांनी गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Related to this topic: