Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पालकमंत्री नरहरी झिरवाळ

पालकमंत्री नरहरी झिरवाळ उद्यापासून दोन दिवस हिंगोली दौऱ्यावर

Minister Narahari Jirwal: हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ ३० एप्रिल रोजी हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरात अनेक महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती देणार आहेत.


पालकमंत्री नरहरी झिरवाळ उद्यापासून दोन दिवस हिंगोली दौऱ्यावर

Minister Narahari Jirwal |

हिंगोली (Minister Narahari Jirwal) : राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narahari Jirwal) हे उद्या गुरुवार, दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नांदेड विमानतळ येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री ७.३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव तसेच मुक्काम राहणार आहे. 

शुक्रवार, दि. १ मे, २०२६ रोजी सकाळी ८ वाजता येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनाच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन येथे व्हिजन क्लब उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यास उपस्थिती. त्यानंतर ११ वाजता खरीप आढावा बैठकीस उपस्थिती. त्यानंतर माझं गाव, आरोग्य संपन्न गाव  कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी १२ वाजता जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुल समिती येथे बॅडमिंटन हॉल(इमारत) उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे राखीव. दुपारी दीड वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने (Minister Narahari Jirwal) पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील. 

Related to this topic: