Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

गुन्हेगारी विरोध मोहीम

शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात विशेष मोहीम राबवा

Anti-Crime Campaign: नांदेड शहरात गुन्हेगारी आणि खुनाच्या घटना वाढल्याने जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसची विशेष मोहीम राबवण्याची मागणी.


शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात विशेष मोहीम राबवा

Anti-Crime Campaign |

जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसची मागणी

नांदेड (Anti-Crime Campaign) : जिल्ह्यात व विशेषतः शहरात वाढती गुन्हेगारी, खुन प्रकरणे, अवैध वाहतूक आदीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे. याकरिता विशेष मोहीम राबवून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालावा, अशी मागणी खा. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवार (ता.७) रोजी करण्यात आली. 

अलीकडच्या काळात नांदेड जिल्ह्यासह (Anti-Crime Campaign) विशेषतः शहरातील कायदा सुव्यवस्था नियंत्रणा बाहेर गेला असून अवघ्या तीन दिवसात पाच खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकरिता विशेष मोहीम राबवून गुन्हेगारी मोडीत काढावी अशी मागणी खा. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार (ता.७) रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे, प्रदेश सरचिटणीस डॉ. रेखा चव्हाण, महेश देशमुख तरोडेकर, बालाजी चव्हाण, आनंद चव्हाण, अब्दुल गफार, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष आरती डोईबळे, मन्ना अब्बास, दिपक हुजुरीया, संजय वाघमारे, अजिज कुरेशी, रमेश गोडबोले, बापूसाहेब पाटील, सत्यजित बिराजदार, मधुकर दिघे, नागराज सुलगेकर, ज्योती कदम, रमेश चित्ते, अभिलाष पावडे, डॉ. रत्नदिप गच्चे, आंबादास रातोळे, अब्दुल बाखी, गौतम सिरसाट, नंदकिशोर देशमुख, रामचंद्र गायकवाड, मधुकर सोनटक्के, शेख मुख्तार, आदीसह इतर पदाधिकारी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदेड शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी (Anti-Crime Campaign) प्रंचड वाढली आहे. नुकत्याच घडलेल्या खुनाच्या घटना पहाता, प्रशासनाची वचक राहिली नाही का? अशा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे.  त्यामुळे विशेष मोहीम राबवून गुन्हेगारी मोडीत काढावी अशी आमची मागणी आहे. 
- राजेश पावडे (जिल्हाध्यक्ष (उ.) नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी.

Related to this topic: