Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

महाराजस्व समाधान शिबिर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये महसूल सेवा उत्तम प्रकारे राबवली जात आहे” – आमदार बोंढारकर

Maharajswa Samadhan Camp: नांदेड येथे आयोजित केलेल्या शिबिरात 702 डिजिटल सातबारा व 669 आठ-अ उताऱ्यांचे वितरण करण्यात आले आणि 10 जणांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळाला.


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये महसूल सेवा उत्तम प्रकारे राबवली जात आहे” – आमदार बोंढारकर

Maharajswa Samadhan Camp |

702 डिजिटल सातबारा व 669 आठ-अ उताऱ्यांचे वाटप; 10 जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

नांदेड (Maharajswa Samadhan Camp) : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. १) अंतर्गत मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांच्या  मार्गदर्शनाखाली डॉ  सचिन खल्लाळ उपविभागीय अधिकारी नांदेड व संजय वारकड तहसीलदार नांदेड यांच्या  निर्देशानुसार तालुक्यातील तिसरे शिबिर विष्णुपुरी येथे उत्साहात पार पडले. विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या (Maharajswa Samadhan Camp) शिबिरामध्ये ग्रामविकास, आरोग्य, कृषी, भूमिअभिलेख (मोजणी) तसेच दुय्यम निबंधक , महावितरण विभागासह विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले. तहसील कार्यालय, नांदेड यांच्या वतीने शिबिरात महसुली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. यामध्ये 702 ऑनलाईन सातबारा उतारे व 669 आठ-अ उतारे नागरिकांना देण्यात आले. तसेच 10 पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय फेरफार संदर्भातील अर्जही स्वीकारण्यात आले.

शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, सातबारा, ८-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभाग, भूमिअभिलेख विभाग व पंचायत विभागानेही नागरिकांना विविध सेवा पुरवल्या. या कार्यक्रमास मतदारसंघाचे आमदार आनंदरावजी बोंढारकर यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध विभागांच्या स्टॉल्सला भेटी देऊन नागरिकांचे विविध प्रश्न ऐकून संबंधित विभागाला तात्काळ सदर प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात   सूचना केल्या. यावेळी आमदार महोदयांनी तहसील कार्यालया मार्फत देण्यात येणारे विविध प्रमाणपत्रे विहित मुदतीत देत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला नांदेड दक्षिणचे आमदार मोंढारकर साहेब यांनी मार्गदर्शन केले.
नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांनी प्रास्ताविकातून अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. नायब तहसीलदार माचेवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर मंडळ अधिकारी श्रीकृष्ण एलमटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. पुरवठा  विभागातील मारतळेकर मॅडम पवार मॅडम यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण केले.

तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी श्रीकृष्ण एलमटे तलाठी रमेश गिरी, मनोज जाधव ,मनोज सरपे, माधव भिसे , महसूल सेवक बालाजी सोनटक्के  यांनी विशेष योगदान दिले. शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Related to this topic: