Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

नांदेड श्वान ‘टायसन’

नांदेड परिक्षेत्राचा श्वान ‘टायसन’ अखिल भारतीय स्पर्धेत अव्वल

Nanded Dog 'Tyson': नांदेडच्या श्वान ‘टायसन’ने ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सुवर्ण व रौप्य पदके पटकावली. ह्या यशामुळे परभणी पोलीस दलाचा सन्मान देशपातळीवर उंचावला.


नांदेड परिक्षेत्राचा श्वान ‘टायसन’ अखिल भारतीय स्पर्धेत अव्वल

Nanded Dog 'Tyson' |

पोलीस कर्तव्य मेळाव्यात सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई

परभणी पोलीस दलाचा मान उंचावला

परभणी (Nanded Dog 'Tyson') : नागपूर येथे २९ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्राचा श्वान ‘टायसन’ याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण व रौप्य पदके पटकावली. या यशामुळे परभणी पोलीस दलाचा सन्मान देशपातळीवर उंचावला आहे. (Nanded Dog 'Tyson')  टायसनने परभणी जिल्ह्यातील चोरी, दरोडा, खून तसेच हरवलेल्या व्यक्तींच्या शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुन्हे उकलण्यासाठी घटनास्थळी मिळालेल्या सुगाव्यांवर अचूक काम करत त्याने अनेक तपासांना गती दिली.

 राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ०४, नागपूर येथे नुकत्याच पारपडलेल्या  अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात देशभरातील २८ राज्ये, ८ केंद्रशासित प्रदेश तसेच विविध निमलष्करी दलांचे पथक सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकूण १४८ श्वानांचा सहभाग होता. महाराष्ट्र पोलीस दलाकडून गुन्हे शोधक श्वानाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी नांदेड परिक्षेत्रातील परभणी पोलीस दलाचा श्वान ‘टायसन’ आणि त्याचे प्रशिक्षक पोलीस हवालदार रामचंद्र जाधव व पोलीस शिपाई सादेक पठाण यांच्याकडे होती. या पथकाने उत्कृष्ट समन्वय साधत ‘शोध व शोधून काढणे’ प्रकारात सुवर्णपदक तर ‘आज्ञाधारकता’ आणि ‘अज्ञात व्यक्तीने दिलेले अन्न नाकारणे’ या प्रकारांत रौप्यपदक मिळवले.

२०२३ मध्ये राज्य पोलीस वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे उत्कृष्ट श्वान सादरीकरण केले तसेच नांदेड परिक्षेत्र कर्तव्य मेळाव्यात सुवर्णपदक पटकावले. (Nanded Dog 'Tyson') परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार विभागाच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती अश्विनी जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आयुब खान पठाण यांच्यासह प्रशिक्षक रामचंद्र जाधव व सादेक पठाण यांनी टायसनच्या प्रशिक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी श्वान पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस व प्रशंसापत्र देऊन गौरविले आहे.

Related to this topic: