Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

खुनाच्या घटनेने नांदेड शहर पुन्हा हादरले

शिवसेना शिंदे गट युवा सेनेचे शहराध्यक्ष असलेल्या सोनू कल्याणकरचा नांदेडमध्ये आज सोमवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास श्रीनगरमध्ये भर रस्त्यावर खून करण्यात आला.


खुनाच्या घटनेने नांदेड शहर पुन्हा हादरले 

Nanded Murder |

गेल्या ७० तासांत खुनाची पाचवी घटना

नांदेड (Nanded Murder) : शिवसेना शिंदे गट युवा सेनेचे शहराध्यक्ष असलेल्या सोनू कल्याणकरचा नांदेडमध्ये आज सोमवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास श्रीनगरमध्ये भर रस्त्यावर खून करण्यात आला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला असून नांदेड शहर सातत्याने होत असलेल्या खून प्रकरणाने चांगलेच हादरले असून गेल्या  ७० तासात पाचव्या खुनाची घटना घडली आहे.

आज सोमवारी सकाळी ५.३० वाजेदरम्यान श्रीनगर परिसरात सोनू कल्याणकर हे आपल्या कुत्र्याला घेऊन नेहमीप्रमाणे फेरफटका मारत होते. त्यावेळी पंचशील कापड दुकानाजवळ आले असता वाहनातून आलेल्या सहा ते सात हल्लेखोरांनी लोखंडी हत्यारे, चाकू आणि तलवारींचा वापर करत कल्याणकरवर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर, मानेवर आणि पाठीवर झपाट्याने वार करून त्यांचा खून केला. सोनू कल्याणकर यांनी काही वर्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कर्तव्य पार पाडले. त्यानंतर शिवसेना शिंदे गट युवा सेनेत दाखल झाले होते.

Related to this topic: