Breaking News
  • "जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही!" – तुपकरांचा सरकारला इशारा
  • अल निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाई होण्याची शक्यता
  • बारामती शहरात आता एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार
  • नाशिकमध्ये वाद मिटवण्याच्या बहाण्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
  • नाशिक-मुंबई महामार्गावरील आर.सी. पाटील पुलावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील मागे बसलेल्या महिलेचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.
  • परभणीत दाखल होताचा खासदार संजय जाधव यांना मिळणार Y+ सुरक्षा
  • बीडमध्ये FDA ची मोठी कारवाई; 6.68 लाखांचा मुद्देमाल जप्त
  • पुणे- ग्रामीण जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
  • छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत ५२.२८ टक्के मतदान

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

नांदेडमध्ये जैन समाजाच्या सन्मान सोहळ्यात मान्यवरांचा गौरव

सकल जैन समाज सेवा संघ, नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य सन्मान सोहळा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला.


नांदेडमध्ये जैन समाजाच्या सन्मान सोहळ्यात मान्यवरांचा गौरव

Nanded Event |

हिंगोली (Nanded Event) : सकल जैन समाज सेवा संघ, नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य सन्मान सोहळा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री दर्जाचे ललित गांधी होते.

यावेळी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना ‘जैन रत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच परभणीचे कारागृह अधीक्षक राजेंद्र जी मरळे आणि 1008 बाहुबली स. तीर्थक्षेत्र, पुसेगावचे अध्यक्ष रवी कान्हेड यांना ‘जैन भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘जीवन गौरव सन्मान’ आणि ‘विशेष सन्मान’ या विभागांतर्गत इतर अनेक मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अध्यक्ष आनंद जैन व सचिव ऋषिकेश कोंडेकर यांनी केले.

जैन समाजाच्या सेवेसाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमास जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: