Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

नांदेड डिझेल टंचाई

डिझेलसाठी पंपांवर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा

Nanded Diesel Shortage: जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीच्या कामांना वेग आला असताना हदगाव तालुक्यातील तामसा परिसरात डिझेल टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. पेट्रोल पंपावर डिझेल


डिझेलसाठी पंपांवर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा

Nanded Diesel Shortage |

 

तासनतास प्रतीक्षेमुळे मशागतीची कामे रखडली; शेतकर्‍यांमध्ये संताप

नांदेड (Nanded Diesel Shortage) : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीच्या कामांना वेग आला असताना हदगाव तालुक्यातील तामसा परिसरात डिझेल टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. पेट्रोल पंपावर डिझेल आल्याची माहिती मिळताच ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागत असून शेतकर्‍यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.

तामसा भागातील दोन्ही पेट्रोल पंपांवर (Nanded Diesel Shortage) मर्यादित प्रमाणात डिझेल उपलब्ध होत असल्याने रात्रीपासूनच शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रांगेत उभे राहत आहेत. मात्र वाढती गर्दी आणि कमी पुरवठ्यामुळे अनेकांना वेळेवर डिझेल मिळत नसल्याची तक्रार आहे. काहींना तर रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या नांगरणी, रोटाव्हेटर, वखरणी यांसारखी मशागतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही सर्व कामे ट्रॅक्टरवर अवलंबून असल्याने डिझेलअभावी शेतीची कामे खोळंबत आहेत. वेळेत मशागत पूर्ण न झाल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, प्रशासनाकडून कॅनमध्ये डिझेल (Nanded Diesel Shortage) देण्यास बंदी असल्याने शेतकर्‍यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. शेतातील यंत्रे सुरू ठेवण्यासाठी वारंवार ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर जावे लागत असल्याने वेळ, मजुरी आणि अतिरिक्त इंधन खर्च वाढत आहे. परिसरात कृत्रिम डिझेल टंचाई निर्माण होत असल्याची शंका काही नागरिकांनी व्यक्त केली असून प्रशासनाने तातडीने पुरवठा सुरळीत करून शेतीकामांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी व ट्रॅक्टर चालकांकडून होत आहे.