Breaking News
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का
  • हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत बेपत्ता झालेल्या बालकाचा संशयास्पद मृत्यू
  • लग्नसोहळ्यात थरार! पुतण्याच्या हल्ल्यात काका-चुलत भावाचा खून
  • इराणची विनाशकारी योजना; गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनची कार्यालये उडवण्याची धमकी
  • IAS तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल '24 वेळा' बदली
  • नासाची आर्टेमिस-2 मोहीम; 54 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्र मोहिमेकडे
  • 'कूपर कॉनोली' ठरला पंजाब किंग्सच्या विजयाचा हिरो

होम > आपले शहर > विदर्भ

मूर्तिजापूरमध्ये विवाहितेचा छळ

मूर्तिजापूरमध्ये विवाहित महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ

मूर्तिजापूर पोलिसांनी विवाहित महिलेच्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. घटना 1 ऑगस्ट 2023 ते 6 एप्रिल 2026 दरम्यानची आहे.


मूर्तिजापूरमध्ये विवाहित महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ

मूर्तिजापूर
सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलेचा पतीसह सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी भूमिका अजय गायकवाड वय 21, रा. रमाबाई वाडी, परिवार सोसायटी, मुलुंड वेस्ट, मुंबई सध्या मुक्काम वडरपूरा, मूर्तिजापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पती अजय गणेश गायकवाड (वय 27), सासू रेखा गणेश गायकवाड (वय 48), आजी सासू सखू गायकवाड (वय 60) व नणंद कु. साक्षी गणेश गायकवाड (वय 24, सर्व रा. रमाबाई वाडी, मुलुंड वेस्ट, मुंबई) यांनी संगनमताने फिर्यादीचा छळ केल्याचा आरोप आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, 1 ऑगस्ट 2023 पासून ते 6 एप्रिल 2026 दरम्यान वारंवार फिर्यादीला मारहाण, शिवीगाळ तसेच मानसिक त्रास देण्यात आला. यावेळी आरोपींनी “माहेरहून सोने व पैसे घेऊन ये” असा दबाव टाकत तिला फारकत देण्याच्या धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या संदर्भात भरोसा सेल येथील कागदपत्रे व फिर्यादीच्या जबाबावरून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी कलम 85, 115(2), 352, 351(2), 3(5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार श्याम मडावी करीत आहेत.(श. प्र )

Related to this topic: