Breaking News
  • SSC Result 2026: मुलींची पुन्हा आघाडी, कोकण अव्वल
  • कलिंगडातून विषप्रयोग? हत्या, अपघात की आत्महत्या – गूढ कायम
  • नाशिक TCS ‘कन्वर्जन’ प्रकरणात मोठी कारवाई; फरार निदा खान अखेर जेरबंद
  • नगरसेवकाच्या फ्लॅटमध्ये लपून राहत होती निदा खान; राजकीय कनेक्शन उघड
  • तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके भाजपला सोडणार ?
  • धक्कादायक खुलासा! मुंबईतील कुटुंब मृत्यू प्रकरणात ‘झिंक फॉस्फाइड’ विषाचे धागेदोरे सापडले
  • दहावी निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के; मुलींची पुन्हा आघाडी
  • TCS ‘धर्मांतर’ प्रकरणात मोठी घडामोड; नारेगावातून निदा खान अटकेत
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या रॅलीत डिजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यातून वाद; वाद सोडवायला गेलेल्या तरुणाची हत्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त इंदिरानगर येथून काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान शहरातील गांधी चौकात झालेल्या वादात वाद सोडवायला गेलेल्याची तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली.


आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या रॅलीत डिजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यातून वाद वाद सोडवायला गेलेल्या तरुणाची हत्या 

Murder Case |

चंद्रपूर (Murder Case) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त इंदिरानगर येथून काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान शहरातील गांधी चौकात झालेल्या वादात वाद सोडवायला गेलेल्याची तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

काल 14 एप्रिल ला डॉ. बाबासाहेबआंबेडकर जयंतीचा उत्साह सुरु असताना गांधी चौकात नाचताना धक्काबुक्की झाल्याने 5 युवकांनी मिळून एकाची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने 5 आरोपीना अटक केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सायंकाळ पासून शहरातील विविध विहारातून भव्य रॅली काढण्यात आली. बाबासाहेबाना मानवंदना देण्यासाठी हजारो अनुयायी रॅलीमध्ये सामील झाले होते. रात्री 11.30 वाजता इंदिरा नगर मधील भीमरत्न बहुद्देशीय युवा संस्था तर्फे गांधी चौकात रॅली पोहोचल्यावर डीजेच्या तालावर नाचताना युवकांमध्ये धक्काबुक्की झाली. या प्रकाराने काही युवक चवताळले त्यांनी वाद घालत काही युवकांना मारहाण केली.

हा वाद सोडवण्यासाठी 36 वर्षीय रविकांत टेम्बुरकर यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता काही युवकांनी रविकांत वर चाकूने वार केले. नागरिकांनी रविकांत ला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र वाटेतच त्या युवकाचा मृत्यू झाला. नागरिकांनी या हल्ल्यानंतर एका आरोपीला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले.

या हल्ल्यात अनिकेत गलबले हा युवक जखमी झाला असून घटना घडल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करीत याप्रकरणी 5 आरोपीना अटक केली.

Related to this topic: