Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > छत्रपती संभाजीनगर

बीड नगरपालिकेत खळबळ; मुख्याधिकाऱ्यांना दालनात घुसून धमकी, हल्ल्याचा प्रयत्न

नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यालाच त्यांच्या दालनात घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना बीड येथे उघडकीस आली आहे.


बीड नगरपालिकेत खळबळ मुख्याधिकाऱ्यांना दालनात घुसून धमकी हल्ल्याचा प्रयत्न

Municipal Office Attack |

बीड (Municipal Office Attack) : नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यालाच त्यांच्या दालनात घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना बीड येथे उघडकीस आली आहे. मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याशी संबंधित हा प्रकार असून, यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी फडसे हे आपल्या दालनात नियमित कामकाज करत असताना एक व्यक्ती तेथे आली. पीटीआरवर नाव नोंदणी करण्याच्या कारणावरून या व्यक्तीने सुरुवातीला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. चर्चा सुरू असतानाच त्याने अरेरावी करत शिवीगाळ केली आणि थेट जीवे मारण्याची धमकी दिली. काही क्षणांतच परिस्थिती चिघळली.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ हस्तक्षेप केला आणि संबंधित व्यक्तीला अडवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा संपूर्ण प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यावरून घटनेची गंभीरता स्पष्ट होत आहे.

या घटनेनंतर पालिका कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. वरिष्ठ अधिकाऱ्याला अशा प्रकारे धमकावण्यात आल्याचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन छेडले. दोषी व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी मुख्याधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाल्याचे सांगत, तक्रार दाखल होताच कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या घटनेमुळे सरकारी कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related to this topic: