Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोलीत नगरपालिकेची तत्परता : शिवशक्ती नगरमधील तुंबलेली गटार मोकळी, नागरिकांत समाधान

शहरातील शिवशक्ती नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भूमिगत गटारीतील पाणी तुंबल्याने रस्त्यावर घाण पाणी वाहत होते.


हिंगोलीत नगरपालिकेची तत्परता  शिवशक्ती नगरमधील तुंबलेली गटार मोकळी नागरिकांत समाधान

Municipal Action |

हिंगोली (Municipal Action) : शहरातील शिवशक्ती नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भूमिगत गटारीतील पाणी तुंबल्याने रस्त्यावर घाण पाणी वाहत होते. या समस्येमुळे नागरिकांना दुर्गंधी व आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक तथा उपाध्यक्ष अब्दुल माबुद बागवान व चंदू लव्हाळे यांनी तातडीने पावले उचलली.

त्यांनी थेट नगराध्यक्ष सौ. रेखाताई बांगर, गटनेते श्रीराम बांगर आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली. या तक्रारीची गंभीर दखल घेत नगरपालिका प्रशासनाने तात्काळ स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. आदेश मिळताच स्वच्छता विभागाचे पथक यंत्रसामुग्रीसह घटनास्थळी दाखल झाले आणि भूमिगत गटार योजनेतील तुंबलेले पाणी मोकळे करून पाण्याला वाट मोकळी करून दिली.

नगरपालिकेच्या या जलद कार्यवाहीमुळे शिवशक्ती नगरमधील रस्ते मोकळे झाले असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल तसेच स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या समस्येला प्राधान्य दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधी आणि जागरूक प्रशासनाच्या समन्वयातून प्रश्न सुटू शकतो याचे हे उदाहरण ठरले आहे.

Related to this topic: