Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

औंढा नागनाथ पोलीस मृत्यू

औंढा नागनाथ येथील मंदिरात कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

Aundha Nagnath Police Death: औंढा नागनाथ मंदिरात सुरक्षा पोलीस म्हणून काम करणारा पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कदम यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्याने मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत


औंढा नागनाथ येथील मंदिरात कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

Aundha Nagnath Police Death |

औंढा नागनाथ (Aundha Nagnath Police Death) : येथे कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षकांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. श्री नागनाथ मंदिरात सुरक्षा पोलीस म्हणून तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर विश्वनाथ कदम (५६) रा. रांजाळा) यांचे सोमवार, २५ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. 

ज्ञानेश्वर कदम हे मागील ११ महिन्यांपासून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रुजू झाल्यापासून ते श्री नागनाथ मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते. दरम्यान सोमवारी मंदिराच्या भक्त निवास क्रमांक एक मधील पोलीस विश्रांती कक्षामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. विश्रांती कक्षामध्ये दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता कदम मृतावस्थेत आढळले. (Aundha Nagnath Police Death) घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, श्रीधर वाघमारे, दत्ता कानगुले, अमोल इंगोले, जमादार गजानन गिरी, वसीम पठाण, रविकांत हरकळ, शाहेद सय्यद, इकबाल शेख, अमोल चव्हाण यांच्यासह मंदिराचे अध्यक्ष वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ व सुरक्षा गार्ड प्रमुख बबन सोनूणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईक व गावकरी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. (Aundha Nagnath Police Death) शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. ज्ञानेश्वर कदम यांच्यावर त्यांचे मूळ गाव रांजाळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आकस्मात जाण्याने पोलीस दलासह औंढा नागनाथ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कदम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली व नातवंड असा परिवार आहे. कर्तव्य बजावत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Related to this topic: