Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोलीच्या श्रीहरी पाध्येंना महावितरणचा ‘उत्कृष्ट यंत्रचालक’ पुरस्कार

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित नांदेड परिमंडळाच्या वतीने गंगा नगर हिंगोली येथील  श्रीहरी सीताराम पाध्ये यांना ‘उत्कृष्ट यंत्रचालक’ हा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


हिंगोलीच्या श्रीहरी पाध्येंना महावितरणचा ‘उत्कृष्ट यंत्रचालक’ पुरस्कार

Mahavitaran Award |

हिंगोली (Mahavitaran Award) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित नांदेड परिमंडळाच्या वतीने गंगा नगर हिंगोली येथील  श्रीहरी सीताराम पाध्ये यांना ‘उत्कृष्ट यंत्रचालक’ हा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कामगार दिनाचे औचित्य साधून नांदेड येथील मुख्य अभियंता कार्यालयात 1 मे 2026 रोजी झालेल्या कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला.

श्री. पाध्ये हे महावितरणच्या 33/11 के.व्ही. उपकेंद्र, जवळा (बु.), हिंगोली येथे वरिष्ठ यंत्रचालक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत निष्ठेने व समर्पित भावनेने सेवा बजावली आहे. विद्युत वाहिन्यांची देखभाल, अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक बिघाडांचे तातडीने निराकरण आणि ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता उल्लेखनीय आहे. त्यांच्या याच कर्तव्यदक्षता, निष्ठा व समर्पित वृत्तीची दखल घेऊन कंपनीने सन 2025-26 करिता त्यांची ‘उत्कृष्ट यंत्रचालक’ म्हणून निवड केली.

मुख्य अभियंता, नांदेड परिमंडळ, राजाराम माने यांच्या हस्ते पाध्ये यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. उषा श्रीहरी पाध्ये उपस्थित होत्या. या सन्मानामुळे महावितरणच्या हिंगोली विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

श्री. पाध्ये यांच्या कार्याचा गौरव हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून, प्रतिकूल परिस्थितीतही अहोरात्र सेवा देणाऱ्या महावितरणच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळालेली प्रेरणा आहे. अविरत सेवेतून ग्राहकांचे समाधान हेच ध्येय मानून काम करणाऱ्या पाध्ये यांच्या या यशाबद्दल हिंगोली परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related to this topic: