Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

महसूल विभाग

७/१२, मालमत्ता कार्डसह महसूल विभागाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस राहणार बंद

Department of Revenue: महाराष्ट्रातील जमीन महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या ऑनलाइन सेवा २ ते ५ एप्रिल दरम्यान तांत्रिक देखभालमुळे बंद राहणार आहेत.


७१२ मालमत्ता कार्डसह महसूल विभागाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस राहणार बंद

Department of Revenue |

हिंगोली (Department of Revenue) : महाराष्ट्र राज्यातील जमीन महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या सर्व संगणकीय प्रणाली आणि ऑनलाइन सेवा काही काळासाठी खंडित करण्यात येणार आहेत. तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे  गुरुवार, २ ते ५ एप्रिल या कालावधीत नागरिकांना या सेवांचा लाभ घेता येणार नाही. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) यांच्या कार्यालयाकडून ही जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या काळात भूमी अभिलेख आणि (Department of Revenue) महाभूमी पोर्टलवरील सर्व महत्त्वाच्या सेवा पूर्णपणे बंद राहतील. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे. ७/१२ (सातबारा) उतारे आणि प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड करणे, ‘क’ प्रत आणि फेरफार (डिजिटल स्वाक्षरी आणि फक्त पाहण्यासाठी असलेल्या सेवा). नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूल सेवा. पोर्टलवरील सर्व ऑनलाइन सेवा कामाचा कालावधी आणि वेळ खालिल प्रमाणे आहे. सेवा बंद होण्याची वेळ: गुरुवार, २ एप्रिल (रात्री ११:५९ वाजल्यापासून) सेवा पुन्हा सुरू होण्याची वेळ: सोमवार, ६ एप्रिल २०२६ (सकाळपासून सर्व सेवा पूर्ववत होतील).  

तांत्रिक कामामुळे या सेवा खंडित होत असल्याने, नागरिकांनी आपली नियोजित कामे या कालावधीच्या आधी किंवा ६ एप्रिलनंतर पूर्ण करावीत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ऐनवेळी होणार्‍या गैरसोयीबद्दल भूमी अभिलेख विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे. या (Department of Revenue) निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी, मालमत्ता धारक आणि व्यावसायिकांना ४ दिवस ऑनलाइन कागदपत्रे काढताना अडचणी येऊ शकतात, त्यामुळे संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

Related to this topic: