Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक:  ८९५ पैकी १३५ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Medical Council: हिंगोलीत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीसाठी ८९५ पैकी १३५ मतदारांनी मतदान केले. यात भाजपाच्या विविध पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.


महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक  ८९५ पैकी १३५ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Medical Council |

हिंगोली (Maharashtra Medical Council) : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या (एमएमसी) अत्यंत चुरशीच्या ठरत असलेल्या निवडणुकीसाठी रविवारी हिंगोली शहरात उत्साहात मतदान पार पडले. या निवडणुकीच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. एकुण ८९५ पैकी १३५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ज्याची १५.०८ टक्केवारी झाली आहे. हिंगोली शहरातील सामान्य रूग्णालयाच्या परिचारीका महाविद्यालयात महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान मतदानाची प्रक्रीया पार पडली. या निमित्ताने भाजपच्या वतीने उभारण्यात आलेल्या पेंडॉलमध्ये  आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह भाजप पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, जिल्हा प्रवक्ते विलास गोरे आणि भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नेत्यांनी उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करून निवडणुकीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. वैद्यकीय क्षेत्रातील ही (Maharashtra Medical Council) निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून, पारदर्शक आणि सक्षम प्रतिनिधी निवडले जावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी पेंडालमध्ये भाजप आणि आयएमएच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने डॉ. मनिष बगडिया, डॉ. जयदिप देशमुख, डॉ. विठ्ठल रोडगे, डॉ. सचिन बगडिया या डॉक्टरांनी मतदानासाठी आलेल्या सहकार्‍यांचे स्वागत केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी पेंडालमध्ये मोठी गर्दी केली होती. यावेळी श्रीरंग राठोड, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, भाऊराव ठाकरे, वैजनाथ शिंदे, सचिन शिंदे,  विक्की मुदीराज यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

हिंगोलीत एकुण ८९५ मतदार होते. ज्यामध्ये पुरूष ६३० व स्त्री २६५ मतदारांचा समावेश होता. रविवारी निवडणुकीच्या प्रक्रीयेत पुरूष १०८ व स्त्री २७ अशा एकुण १३५ डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्याची १५.०८ टक्केवरी झाली असल्याची माहिती निवडणुक निरीक्षकांनी दिली आहे.

Related to this topic: