Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भरधाव कार अपघात

भरधाव कारची पलटी; मद्यधुंद चालकाचा राडा

High Car Accident: सेनगावमध्ये एका मद्यधुंद चालकाने अपघातानंतर मदत करणाऱ्या कामगारांवर दगडफेक आणि मारहाण केली. परिस्थिती तणावपूर्ण बनली असून पोलिस चौकशी सुरू आहे.


भरधाव कारची पलटी मद्यधुंद चालकाचा राडा

High Car Accident |

 

मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाच दगडाने मारहाण, हायवा गाडीची काच फोडली

सेनगाव (High Car Accident) : हत्ता ते साखरा मार्गावरील ऊटी ब्रम्हचारी गावाजवळ मंगळवारी दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास भरधाव वेगातील कार थेट पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातानंतर मदतीला धावलेल्या रस्ते कामगारांवरच मद्यधुंद चालकाने दगडफेक व मारहाण केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा येथून भरधाव वेगाने येणारी कार ऊटी ब्रम्हचारी गावाजवळ नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. कारमध्ये चालकासह आणखी एक जण प्रवास करत होता. दोघेही मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. (High Car Accident) अपघाताची माहिती मिळताच हत्ता-तळणी रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीचे सुपरवायझर, इंजिनियर व मजूर मदतीसाठी घटनास्थळी धावले. त्यांनी कारमधील व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मदत करणाऱ्यांवरच चालकाने संताप व्यक्त करत दगडाने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

यावेळी रस्ते कामात वापरल्या जाणाऱ्या कंपनीच्या हायवा वाहनाची काच दगडफेकीत फुटली. तसेच जिओ कंपनीच्या साईटवर काम करणाऱ्या सुपरवायझरलाही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या (High Car Accident) प्रकारामुळे कामगार व नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान, हत्ता-तळणी मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. सायंकाळी संबंधित रस्ता निर्मिती कंपनीचे कामगार सेनगाव पोलिस ठाण्यात दाखल झाले असून, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Related to this topic: