Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

निकतवाडा येथे कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

घोट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निकतवाडा येथे सध्या प्रचंड उष्णतेच्या दिवसांत कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना दिवसरात्र मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


निकतवाडा येथे कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

Low Voltage Problem |

नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

घोट (Low Voltage Problem) : घोट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निकतवाडा येथे सध्या प्रचंड उष्णतेच्या दिवसांत कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना दिवसरात्र मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सिंगल फेज व कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पंखे, कुलर तसेच पाण्याच्या मोटारी यांसारखी विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती वापरातील उपकरणे वारंवार बंद पडत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची समस्या अधिक गंभीर बनत असून, मोटारी सुरू होत नसल्याने पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत आहे.

निकतवाडा परिसरात वाढती लोकसंख्या व वाढलेला वीज वापर लक्षात घेता विद्यमान ट्रान्सफार्मर अपुरा पडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे महावितरण विभागाने तातडीने दखल घेऊन नवीन ट्रान्सफार्मर उपलब्ध करून कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related to this topic: