Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

धारासुर मंदिर

परभणीच्या धारासुर येथील मंदिरावर कोसळली वीज...!

Dharasur Temple Lightning: महाराष्ट्रातील धारासुर मंदिरावर वादळी पावसात वीज पडून नुकसान झाले, परंतु सौभाग्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


परभणीच्या धारासुर येथील मंदिरावर कोसळली वीज

Dharasur Temple Lightning |

वादळी पावसात घडली घटना; सुदैवाने जीवितहानी टळली

धारासुर (Dharasur Temple Lightning) : गंगाखेड तालुक्यातील धारासुर येथे सोमवार ३० मार्च रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसासह जोरदार वादळी वारे वाहत होते. अवकाळी पावसादरम्यान वीजेचा कडकडाट होऊन श्रीराम मंदिराच्या कळसावर वीज कोसळली. (Dharasur Temple Lightning) मंदिराचा कळस जमिनीवर कोसळला. या घटनेमुळे गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी रात्री मंदिरात २० ते २५ महिला व पुरुष पोथी पारायणासाठी उपस्थित होते.

अचानक झालेल्या या (Dharasur Temple Lightning) प्रकारामुळे मंदिर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. श्रीराम मंदिर हे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून आजूबाजूला घरे असल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली होती. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वेळानंतर पाऊस व वादळ कमी झाल्यानंतर गावकर्‍यांनी मंदिर परिसराची पाहणी केली असता मंदिराचा कळस जमिनीवर पडलेला दिसून आला. तसेच मंदिराच्या वरच्या भागाचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच गावातील शेकडो नागरिकांनी मंदिर परिसरात धाव घेतली. (Dharasur Temple Lightning) संबंधित प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: