Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > गोंदिया

शेतकरी आंदोलन

शेतकऱ्याचे पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

Farmers Andolan: जिल्ह्यातील पालेवाडा येथे एक शेतकरी कृष्णकुमार डोयेने महसूल नोंदीतून गायब झालेल्या १.६७ हेक्टर जमिनीवर आरोप करून पाण्याच्या टाकीवर आंदोलन


शेतकऱ्याचे पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

Farmers Andolan |

 

महसूल नोंदीतून १.६७ हेक्टर जमीन गायब?

गोंदिया (Farmers Andolan) : जिल्ह्यातील Goregaon तालुक्यातील पालेवाडा येथे एका शेतकऱ्याने महसूल नोंदीतून शेतजमीन कमी झाल्याचा आरोप करत थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. कृष्णकुमार डोये असे आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचे नाव असून, “जोपर्यंत जमीन पुन्हा रेकॉर्डवर येत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

शेतकरी कृष्णकुमार डोये यांनी महसूल विभागावर गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांच्या हक्काची सुमारे १.६७ हेक्टर शेतजमीन महसूल नोंदीतून कमी करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी महसूल विभाग, तहसील कार्यालय तसेच विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने आणि पत्रव्यवहार केला. मात्र अद्याप कोणतीही ठोस चौकशी किंवा निर्णय झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

डोये यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजा पालेवाडा येथील जुना गट क्रमांक ३३६ अंतर्गत त्यांच्या वडिलांच्या नावे एकूण १०.१४ हेक्टर शेतजमीन नोंद होती. सन १९८९ मध्ये संबंधित जमिनीची कायदेशीर विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार गट क्रमांक ३३६/४ आणि ३३६/५ असे भाग पाडून संबंधित कुटुंबीयांच्या नावे फेरफार नोंदी करण्यात आल्या होत्या.

तलाठी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, जुना गट क्रमांक ३३६ हा नवीन गट क्रमांक ४१७ मध्ये रूपांतरित करण्यात आला. मात्र नव्या महसूल नोंदीमध्ये एकूण क्षेत्रफळ १०.१४ हेक्टरऐवजी केवळ ८.४७ हेक्टर दाखविण्यात आल्याने सुमारे १.६७ हेक्टर जमीन गायब झाल्याचा आरोप (Farmers Andolan) शेतकऱ्याने केला आहे.

प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने अखेर कृष्णकुमार डोये यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन (Farmers Andolan) सुरू केले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Related to this topic: