Breaking News
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का
  • हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत बेपत्ता झालेल्या बालकाचा संशयास्पद मृत्यू
  • लग्नसोहळ्यात थरार! पुतण्याच्या हल्ल्यात काका-चुलत भावाचा खून
  • इराणची विनाशकारी योजना; गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनची कार्यालये उडवण्याची धमकी
  • IAS तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल '24 वेळा' बदली
  • नासाची आर्टेमिस-2 मोहीम; 54 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्र मोहिमेकडे
  • 'कूपर कॉनोली' ठरला पंजाब किंग्सच्या विजयाचा हिरो

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कयाधू नदी आंदोलन

खांबाळा परिसरात कयाधू नदीचे आंदोलन पेटले; शेतकरी आक्रमक

Kayadhu River Andolan: हिंगोलीतील खांबाळा शिवारात शेतकरी आंदोलन पेटले आहे. कयाधू नदीचे पाणी पळविण्याचा आरोप असून, शेतकरी आक्रमक झाले आहेत. आंदोलन तीव्र असून ते बंद करावे लागेल.


खांबाळा परिसरात कयाधू नदीचे आंदोलन पेटले शेतकरी आक्रमक

Kayadhu River Andolan |

हिंगोली (Kayadhu River Andolan) : कयाधू नदी खरबी या ठिकाणी भूमिगत मार्गाने बोगदा करून कयाधू नदीचे पाणी पळविण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे शेतकरी नेते रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ७ एप्रिल मंगळवार रोजी खांबाळा शिवारात अनेक शेतकर्‍यांसह ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत हे काम थांबविले जाणार नाही, तो पर्यंत आंदोलन चालूच राहील असा निर्धार करण्यात आला आहे.

खरबी शिवारात भूमिगत मार्गाने कयाधू नदी (Kayadhu River Andolan) इसापूर धरणात बोगद्याव्दारे कयाधू नदीचे पाणी वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे पाणी इतरत्र वळविल्याने हिंगोली जिल्ह्यातील शेतीचे वाळवंट होणार आहे. कयाधू नदीचे पाणी वळविल्याने कळमनुरीच्या दिशेने शेकडो गावाला पाणी पुरवठा करणार्‍या विहिरी, नदीला पाणी मिळणार नाही. त्यामुळे पाणी प्रश्न बिकट होऊ शकतो, सध्या स्थितीत कयाधू नदीत आता शिल्लक पाणी राहीले नसुन भविष्यात हे पाणी वळविल्याने नदीमध्ये शिल्लक पाणी साठाच राहणार नाही. त्यामुळे हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेतीला पाणी सुध्दा मिळणार नाही.

भूमिगत बोगद्यासाठी १५१ हेक्टर जमीन लागणार असुन जमीन संपादीत न करता नियम धाब्यावर बसवून शेतकर्‍यांना धाक धडक व धमक्या देऊन हे बोगद्याचे काम केले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. आज परिस्थितीमध्ये जबरदस्तीने २० मीटर भूमित बोगद्याचे काम चालू करण्यात आले आहे. या बोगद्याचे काम ७ एप्रिल पर्यंत बंद करावे अन्यथा हिंगोली व सेनगाव तालुक्यातील प्रत्येक ६ गावातील ग्रामस्थ लेकर, बाळ व गुराढोरांसह खांबाळा शिवारातील रेल्वे पटरीच्या बाजूला बोगद्याच्या ठिकाणी बेमुदत आंदोलनाला बसतील असा इशारा निवेदनाव्दारे यापूर्वीच दिला होता. त्यानुसार शेतकरी नेते रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले.

विशेष हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी घटनास्थळी हिंगोली ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मरे, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे यांच्यासह पोलिस कर्मचारी तसेच महसुलचे तलाठी, मंडळ अधिकारी, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कर्मचारी उपस्थित होते. एकीकडे उपविभागीय दंडाधिकारी समाधान घुटूकडे यांनी प्रतिबंधित क्षेत्रा संदर्भात आदेश काढला. परंतु हे आंदोलन नेमक्या कोणत्या गटामध्ये केले जाणार याची माहिती मात्र महसुलच्या पथकाला नसल्याने काहीवेळ गोंधळ उडाला होता.

त्यातच पोलिसांनी या स्थळी येणार्‍या आंदोलनकर्त्यांना प्रतिबंधित क्षेत्राची माहिती दिली असता, आंदोलनकर्त्यांनी नेमके प्रतिबंधित क्षेत्र कोणत्या गटात आहे, असा प्रश्न उपस्थित केला. परंतु महसुलच्या कर्मचार्‍यांना निश्चीत गट नंबर सांगता आला नाही. एकीकडे आंदोलनकर्ते आंदोलनावर ठाम असताना महसुल व उर्ध्वपैगंगा प्रकल्पाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी आले नसल्याने प्रशासनाची उदासिनता दिसून आली.

या (Kayadhu River Andolan) आंदोलनात शेतकरी नेते रमेश शिंदे यांच्यासह डॉ रमेश शिंदे, प्रल्हाद गवळी, संदेश देशमुख, बाजीराव इंगोले, माधवराव कोरडे, भानुदास जाधव, दत्तराव पवार, दतराव जाधव, विठ्ठल पडघन, सुधाकर पवार, उद्धव पवार, सारंगधर काळे, मधुकर काळे, किसनराव काळे, माधव काळे, ओम काळे, रामेश्वर कोरडे, ज्ञानेश्वर काळे, वैजनाथ गवळी, पुरुषोत्तम काळे, शिवाजी काळे, शिवाजी कोरडे, गोविंदा गवळी, चंद्रभान गवळी, मारुती शिखरे, नंदाबाई शिकरे, नंदाबाई शिखरे, गोदावरी काळे, सिंधुबाई गवळी यांच्यासह अनेक शेतकरी व महिला सहभागी होत्या. जोपर्यंत बोगद्याचे काम बंद केले जाणार नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा शेतकरी नेते रमेश शिंदे केसापूर यांनी दिला आहे. 

प्रतिबंधीत क्षेत्रात निर्बंधासाठी उपविभागीय अधिकार्‍यांनी काढली नोटीस

खरबी वळण बंधारा, खरबी ते इसापूर जलाशय पाणी वहन प्रणालीचे बांधकाम व अनुषंगीक कामाच्या ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी ६ एप्रिलला एका आदेशाव्दारे जाहीर केले. ज्यामध्ये (Kayadhu River Andolan) खरबी वळण बंधारा व खरबी ते इसापूर जलाशय पाणी वहन प्रणाली बोगद्याचे काम व खोदकाम प्रगतीपथावर आहे. सदर ठिकाणी सुरूंग पध्दतीने लागणारी यंत्र सामग्री कार्यक्षेत्रावर ठेवण्यात आली आहे. या साहित्याचा वापर केला जात असुन कामाच्या ठिकाणी सर्वसामान्य नागरीकांची अनावश्यक वर्दळ झाल्यास अपघात होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याकरीता खरबी गट क्र. १६६, १६४, १६३, ३३ वरुड गवळी २२७, २४६, २४७ खांबाळा २३६, २४१, २४२, २३५, बळसोंड १२, १५, १४, १४१, १४२, बासंबा ३२०, ३२२, २२३, २२४, २२५, २२६, २२७, ३४५, ३४४, ३३१ सायाळ २२, ४१, ४२, ४३, चिंचोली १५४, १५७, १५५, १५२, १५३, ९९, ९८, ९५, ९७, ९६, १९५, नांदूसा गट क्र. ७७,७८, ८३ या बंधारा व बोगद्याच्या कामामुळे हे क्षेत्र प्रतिबंधित जाहीर करण्यात आले आहे. हा आदेश ६ एप्रिल ते ५ मे रोजी पर्यंत अमलात राहील असे आदेशात नमुद करण्यात आले.

Related to this topic: