Police Black Market: उदगीर ग्रामिन पोलिस स्टेशनमध्ये लाचखोरी प्रकरण उघड. पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्यासह हवलदार रंगेहात पकडले गेले, ३ लाख रुपये लाचेची मागणी.
उदगीर (Police Black Market) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (लाप्रवि.) धडाकेबाज कारवाईने उदगीर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.या कारवाइने खाकीतील काळा बाजार उघड झाला आहे.उदगीर ग्रामिन पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात तब्बल ३ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस निरीक्षकासह एका पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलिस खात्याच्या प्रतिमेलाच मोठा धक्का बसला आसून खाकीतील काळा कारनामा उघड झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील ४३ वर्षीय तक्रारदाराने लाप्रवि. लातूर येथे धाव घेत आरोपींच्या लाचखोरीचा पर्दाफाश केला. (Police Black Market) तक्रारदाराच्या मेव्हण्यावर उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आरोपींनी तब्बल ३ लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, २ एप्रिल रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली असता पोलीस कर्मचारी राहुल नागरगोजे यांनी पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या सांगण्यावरून ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर लाप्रवि.च्या पथकाने सापळा रचत अहमदपूर रोडवरील हॉटेल पंचवटी येथे कारवाई केली. यावेळी राहुल नागरगोजे याने ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले. विशेष म्हणजे, लाच स्वीकारल्यानंतर नागरगोजे यांनी तात्काळ निरीक्षक पुजारी यांना फोन करून ‘काम झाल्याची’ माहिती दिली. त्यानंतर पुजारी यांनीही फोनवरून “पैसे पाठवा, मदत करतो” असे सांगत लाच व्यवहारात सहभाग सिद्ध केला.
कारवाईदरम्यान आरोपींकडून मोबाईल हँडसेटसह लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या घरांची झडतीही सुरू आहे.
या (Police Black Market) प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून तपास पोलीसनिरीक्षक विशाल बहात्तरे करीत आहेत. या घटनेमुळे “रक्षकच भक्षक झाले का?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत असून, पोलिस यंत्रणेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
ज्या ठाण्याचे प्रभारी त्याच ठाण्यात गुन्हा दाखल !
उदगीर ग्रामिण पोलिस स्टेशनचे प्रभारी आसाणारे पोलिस निरिक्षक राजकुमार पुजारी यांच्यावर (Police Black Market) लाच स्विकारल्याचा गुन्हा ते ज्या ठाण्याचे प्रभारी होते त्याच ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामूळे प्रभारी आसणारे पुजारी यांच्यावर त्यांच्याच ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.जनतेचे रक्षण करणारेच गुन्हेगार ठरत आसतील तर जनतेने कुणाकडे न्याय मागावा आसा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.