Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

महात्मा ज्योतिबा फुले

टेकाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सव थाटात संपन्न

Mahatma Jyotiba Phule: टेकाडी येथे अखिल भारतीय माळी महासंघ द्वारे आयोजित क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जन्मवर्ष जयंती महोत्सव उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.


टेकाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सव थाटात संपन्न

Mahatma Jyotiba Phule |

कन्हान (Mahatma Jyotiba Phule) : अखिल भारतीय माळी महासंघ तालुका पारशिवनी, जिल्हा नागपुर व्दारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जन्मवर्ष निमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सव अत्यंत उत्सा हपुर्ण व प्रेरणादायी वातावरणात थाटात संपन्न झाला.  

शनिवार (दि.११) एप्रिल सायंकाळी ७ वाजता अखिल भारतीय माळी महासंघ तालुका पारशिवनी, जि. नागपुर व्दारे श्रीकृष्ण मंदिर परिसर टेकाडी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जन्मवर्ष निमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती महो त्सवाचे मा. रविंद्र गणोरकर यांच्या अध्यक्षेत तर ॲड. राजेंद्र महाडोळे प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ, महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी मा. मनोज गणोरकर जिल्हाध्यक्ष अखि ल भारतीय माळी महासंघ नागपुर तर प्रमुख पाहुणे मा. वसंतराव गाडगे अध्यक्ष, प्रागतिक अध्यापक शिक्ष ण संस्था, नागपुर, डॉ. प्रा. मनोज होले यांच्या उपस्थि त महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. मार्गदर्शन करताना ॲड. राजेंद्र महाडोळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले च्या कार्याचा गौरव करित समाजातील सर्व घट कांसाठी कार्य केले. त्या काळात शिक्षणापासुन वंचित सर्व समाज घटकांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, स्त्रियांची दयनीय स्थिती आणि सामाजिक विषमता विरुद्ध त्यांनी ठाम पणे आवाज उठविला.

सत्यशोधक समाजाची स्थाप ना करून त्यांनी अंधश्रद्धा, कुप्रथा, सतीप्रथा, विधवां वरील अन्याय यांना विरोध करत समाज सुधारण्याचे महान कार्य केले. त्यांनी पुढे संबोधित केले की, आज ही माळी समाज विविध पोटजातींमध्ये विभागलेला असल्यामुळे एकसंघ शक्ती निर्माण होत नाही. समाजा ला संघटित करण्यास गावागावांत प्रबोधन शिबिरे आयोजित केली जात आहेत. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योजकता वाढविणे, महि लांना स्वावलंबी बनविणे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व शिष्यवृत्ती मिळवुन देणे हे संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. संपुर्ण महाराष्ट्रात संघटन बळकट करण्या चे कार्य सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  यावेळी डॉ. प्रा. मनोज होले यांनी सामाजिक परिवर्त नासाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. वसंत राव गाडगे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याचा सखोल आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष मनोज गणोरकर यांनी समाज बांध वांनी संघटित होऊन प्रत्येक गावात संघटनेच्या शाखा स्थापन करण्याचे आवाहन केले.

या (Mahatma Jyotiba Phule) महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे प्रसारण करणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि समाजात जागृती निर्माण करणे हे होते. या कार्यक्रमास टेकाडी, गोंडेगाव, वराडा, कांद्री, डोरली, अरोली तसेच परिसरातील इतर गावांतील समाजबांधव, युवक, महिला व नागरिकांनी बहु संख्ये ने उपस्थित राहुन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पारशिवनी तालुका परिसरात अशा स्वरूपाचा माळी समाजाचा भव्य कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह दिसुन आला. कार्यक्रमा चे सुत्रसंचालन मनोज मोहाडे यांनी तर आभार प्रदर्शन किशोर वासाडे यांनी केले. अखिल भारतीय माळी महासंघ, तालुका पारशिवनीच्या वतीने सर्व उपस्थितां चे आभार व्यकत करण्यात आले.

Related to this topic: