Breaking News
  • SSC Result 2026: मुलींची पुन्हा आघाडी, कोकण अव्वल
  • कलिंगडातून विषप्रयोग? हत्या, अपघात की आत्महत्या – गूढ कायम
  • नाशिक TCS ‘कन्वर्जन’ प्रकरणात मोठी कारवाई; फरार निदा खान अखेर जेरबंद
  • नगरसेवकाच्या फ्लॅटमध्ये लपून राहत होती निदा खान; राजकीय कनेक्शन उघड
  • तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके भाजपला सोडणार ?
  • धक्कादायक खुलासा! मुंबईतील कुटुंब मृत्यू प्रकरणात ‘झिंक फॉस्फाइड’ विषाचे धागेदोरे सापडले
  • दहावी निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के; मुलींची पुन्हा आघाडी
  • TCS ‘धर्मांतर’ प्रकरणात मोठी घडामोड; नारेगावातून निदा खान अटकेत
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

ईसापुर धरण मृत्यू

ईसापुर धरणात बुडून ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Isapur Dam Death: हिंगोली जिल्ह्यातील अरविंद वाघमारे यांचा ईसापुर धरणात बुडून मृत्यू झाला. २८ एप्रिल रोजी ते धरणात पोहण्यासाठी गेले होते


ईसापुर धरणात बुडून ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Isapur Dam Death |

हिंगोली (Isapur Dam Death) : हिंगोली जिल्ह्यातील कलगाव येथील ३५ वर्षीय अरविंद चंद्रमुनी वाघमारे यांचा ईसापुर धरणाच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अरविंद वाघमारे हे  सासुरवाडी सुकळी वळण येथे आले होते. २८ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ते पोहण्यासाठी ईसापुर धरणाच्या (Isapur Dam Death) पात्रात गेले असल्याची  माहिती नातेवाईकाने दिली मात्र, त्यानंतर ते परत न आल्याने शोध सुरू करण्यात आला. २९ एप्रिल रोजी दुपारी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह (Isapur Dam Death) पाण्याबाहेर काढला.यावेळी कळमनुरी पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, बीट जमादार संजय राठोड, अरविंद राठोड, कानबाराव हराळ, किशोर खिल्लारे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,तीन मुलं, भाया, जाऊ,सासू , एक भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर कलगाव येथील स्मशानभूमीत  २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आला.  या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related to this topic: