Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

स्थानिक गुन्हे शाखेची आय.पी.एल. सट्ट्यावर मोठी कारवाई! लाखोंचा मुद्देमाल जप्त

२५ एप्रिल रोजी रात्री ८:१५ वाजता पोहरादेवी–सिंगद रोडवरील किसनराव हायस्कूलसमोर आयपीएल सट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली.


स्थानिक गुन्हे शाखेची आयपीएल सट्ट्यावर मोठी कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त

IPL Betting |

६ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त! 

मानोरा (IPL Betting): पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोहरादेवी–सिंगद रोडवरील किसनराव हायस्कूल समोर दि. २५ एप्रिल रोजी रात्री ८:१५ वाजता स्थानिक गुन्हे शाखा वाशीम पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आय.पी.एल. सट्ट्यावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत नगदी १ लाख ७ हजार रुपये यासह एकूण ६ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलीस कर्मचारी गजानन गोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी श्याम उर्फ गजनी पवार (रा. शेंदोणा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानोरा पोलीस करतात तरी काय? जनतेचा सवाल

पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोहरादेवी बीटमध्ये पोहरादेवी ते सिंगद रोडवरील किसनराव हायस्कूल समोरील रोडवर आय.पी.एल. सट्टा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे ए.पी.आय. जगदीश बांगर यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी धाड टाकली. यावेळी आरोपी श्याम उर्फ गजनी पवार (रा. शेंदोणा) यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये १ लाख ७ हजार रुपये नगदी रोख रक्कम, चारचाकी हुंडई आय-२० कंपनीची गाडी (क्रमांक एमएच-४१ एएस-४५५५) व व्हिओ कंपनीचा मोबाईल असा एकूण ६ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध २५ एप्रिलच्या मध्यरात्री १:३६ वाजता कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास ए.पी.आय. जगदीश बांगर करीत आहेत.

दरम्यान, मानोरा शहरात आय.पी.एल. सट्टा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस जिल्हा ठिकाणावरून मध्यरात्री हजर राहून छापा टाकत आहेत, तर स्थानिक पोलीस प्रशासन करतात तरी काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Related to this topic: