Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली नगरपालिकेच्या नोटीसनंतर तात्काळ हटवले धोकादायक होर्डिंग व टॉवर

हिंगोली शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हिंगोली नगर परिषदेने मोठी कारवाई केली आहे.


हिंगोली नगरपालिकेच्या नोटीसनंतर तात्काळ हटवले धोकादायक होर्डिंग व टॉवर

Illegal Hoardings |

हिंगोली (Illegal Hoardings) : हिंगोली शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हिंगोली नगर परिषदेने मोठी कारवाई केली आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये लाकडी बांबू आणि बल्लीच्या सहाय्याने उभारलेले अनधिकृत होर्डिंग व टॉवर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याची बाब नगरपालिकेच्या निदर्शनास आली होती. यावर तातडीने पाऊल उचलत नगरपालिकेने संबंधितांना 14 मे रोजी नोटीस बजावली. त्यानुसार होल्डिंग व बॅनर तात्काळ हटविण्यात आले.

हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, म. गांधी चौक, अग्रसेन महाराज चौक, इंदिरा गांधी चौक तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यालगत मोठमोठे टॉवर उभारून त्यावर बॅनर लावण्यात आले आहेत. अवकाळी पाऊस व सोसाट्याचा वारा आल्यास हे टॉवर व बॅनर रस्त्यावर कोसळून नागरिकांच्या  जीविताला व मालमत्तेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे
हिंगोली शहरातील सात जणांना पोलिसांनी नोटीसद्वारे सक्त ताकीद देण्यात आली. महाराष्ट्र विरूपण अधिनियम 1965 चे कलम 2 क नुसार, नोटीस मिळाल्यानंतरही टॉवर न काढल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता थेट शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला होता.

नगरपालिकेच्या या कडक भूमिकेचा तात्काळ परिणाम दिसून आला. नोटीस मिळताच संबंधितांनी शहरातील सर्व धोकादायक लाकडी टॉवर व त्यावरील होर्डिंग तातडीने हटवले. नगरपालिकेच्या या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. 

मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सांगितले की, शहराचे सौंदर्य व नागरिकांची सुरक्षा ही नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. यापुढेही अनधिकृत होर्डिंग व बांधकामांवर कठोर कारवाई सुरू राहील. शहरात परवानगीशिवाय कोणतेही टॉवर किंवा बॅनर उभारल्यास थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे.

Related to this topic: