Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

अहेरीत 2025 सालचा 21 लाखांचा मुद्देमाल नष्ट

मानवी आरोग्यास घातक ठरणारा सुगंधी तंबाखू आणि अवैध बीटी बियाणांचा भलामोठा साठा आज अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार 'भस्मसात' करण्यात आला.


अहेरीत 2025 सालचा 21 लाखांचा मुद्देमाल नष्ट

Illegal Goods Destruction |

अहेरी श (Illegal Goods Destruction) : गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्यांवर कायद्याचा बडगा उगारत, माननीय पोलीस अधीक्षक मा.एम रमेश सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मा.कार्तिक मधिरा सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजय कोकाटे सर यांचे मार्गदर्शनाखाली अहेरी पोलीस स्टेशनचे धडाडीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या थेट देखरेखीखाली आज एक मोठी कायदेशीर प्रक्रिया पार पडली. सन २०२५ मधील विविध आठ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला, मानवी आरोग्यास घातक ठरणारा सुगंधी तंबाखू आणि अवैध बीटी बियाणांचा भलामोठा साठा आज अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार 'भस्मसात' करण्यात आला.

कायद्याच्या चौकटीत राहून, माननीय न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार आज दोन पंचांच्या उपस्थितीत ही नष्टीकरण मोहीम अत्यंत पारदर्शकतेने राबवण्यात आली. यामध्ये समाजाला व्यसनाच्या खाईत लोटणारा ११ लाख ९० हजार १८० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ९ लाख ६२ हजार ९६२ रुपये किमतीचा अवैध बीटी बियाणांचा साठा, असा एकूण २१ लाख ५३ हजार १४२ रुपयांचा जप्त केलेला मुद्देमाल कायदेशीररीत्या नष्ट करून त्याचे अस्तित्व संपविण्यात आले.

पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या या धडक आणि पारदर्शक कृतीमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून, अहेरी पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related to this topic: