Electric Power Supply: मीटरला येणार्या वीज पुरवठा केबलला अनाधिकृतरित्या वीज जोडणी घेऊन थेट वीजेचा वापर केल्याने शहरातील सहा वीज ग्राहकावर गुन्हे दाखल करण्यात आले.
हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल
हिंगोली (Electric Power Supply) : शहरामध्ये काही वीज ग्राहकाकडे महावितरणची थकबाकी असल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. परंतु त्यांनी मीटरला येणार्या वीज पुरवठा केबलला अनाधिकृतरित्या वीज जोडणी घेऊन थेट वीजेचा वापर केल्याने शहरातील सहा वीज ग्राहकावर गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील जैन गल्ली व दत्त नगर भागात सहाय्यक अभियंता सचिन बेरसले यांच्यासह पथकाने १३ मार्च रोजी अनेक विद्युत मीटरची पाहणी केली. ज्यामध्ये काही ग्राहकाकडे थकबाकी रक्कम असल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. परंतु त्यांनी मीटरला येणार्या वीज पुरवठा केबलला अनाधिकृतरित्या जोडणी घेऊन थेट वीजेचा वापर केल्याचे तपासणी दरम्यान निदर्शनास आले. ज्यामध्ये जैन गल्लीतील अब्दुल करीम शेख हसन, बलराम भुमन्ना येल्लारे रा. जैन गल्ली हिंगोली, शेख इब्राहीम शेख सयाजी रा. दत्त नगर हिंगोली यांनी २९५ युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले.
महावितरण कंपनीचे ४४९० रुपयाचे आर्थिक नुकसान केले व या वीज ग्राहकाकडे महावितरणचे पुर्वीच थकीत वीजबील रक्कम २० हजार ८७० इतके बाकी असुन त्याचा भरणा करण्यात आला नाही. त्याच प्रमाणे हिंगोलीतील भोईपुरा व पेन्शनपुरा भागातही या पथकाने वीज मीटरची पाहणी केली. ज्यामध्ये भोईपुरा भागातील देऊजी मानकोजी आडणे रा. भोईपुरा हिंगोली याने स्मार्ट मीटरवरील वीज पुरवठा महावितरण कंपनीच्या संगणक प्रणालीव्दारे थकबाकीमुळे पुर्वीच बंद केला होता.
परंतु त्याने मीटरला येणार्या वीज पुरवठा केबलला अनाधिकृतरित्या (Electric Power Supply) वीज जोडणी घेऊन थेट वीजेचा वापर सुरू केल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले. तसेच पेन्शनपुरा भागातील चंद्रकांत नामदेव गाडे, शेख जहीर शेख कदीर या दोघांकडे महावितरणची वैध जोडणी नसून नजीकच्या लघुदाब वीज वाहीनीवर आकोडा टाकुन अनाधिकृतरित्या वीजेचा वापर केला. या तिन्ही आरोपींनी ४८१ युनिटची वीज चोरी केली. महावितरण कंपनीचे ९९२० रुपयाचे आर्थिक नुकसान केले.
तसेच या ग्राहकाकडे महावितरण कंपनीची पुर्वीची थकीत वीज बील (Electric Power Supply) रक्कम २४८३० रुपये इतके बाकी असुन त्याचा भरणा करण्यात आलेला नाही. त्यामुळे १९ मार्चला हिंगोली शहर पोलिसात सहाय्यक अभियंता सचिन बेरसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊजी मानकोजी आडणे रा. भोईपुरा, चंद्रकांत नामदेव गाडे, शेख जहीर शेख कदीर रा. पेन्शनपुरा हिंगोली या तिघावर भारतीय विद्युत कायदा सन २००३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास आर.एस. कोरडे हे करीत आहेत.