Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायत अधिकार्‍यास प्रमाणपत्रासाठी मारहाण

Hingoli Gram Panchayat Officer: हिंगोलीतील ग्रामपंचायत अधिकारी मिलिंद विठ्ठलराव साबणे यांना नळजल मित्र निवडाचे प्रमाणपत्र न दिल्याने वैजनाथ दत्तराव शिंदे यांनी मारहाण केली.


ग्रामपंचायत अधिकार्‍यास प्रमाणपत्रासाठी मारहाण

Hingoli Gram Panchayat Officer |

 

नळ जल निवडीचे प्रमाणपत्र न दिल्याने मारहाण; हिंगोली शहर पोलिसात एकावर कारवाई

हिंगोली (Hingoli Gram Panchayat Officer) : पंचायत समिती मधील ग्रामपंचायत अधिकार्‍यास नळजल मित्र निवडीचे प्रमाणपत्र न दिल्याच्या कारणावरून हिंगोलीत मारहाण केल्याची घटना घडल्याने हिंगोली शहर पोलिसात बोडखी येथील एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, (Hingoli Gram Panchayat Officer) हिंगोली पंचायत समिती कार्यालयातील मिलिंद विठ्ठलराव साबणे हे ग्रामपंचायत अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. २५ मे रोजी दुपारी १२.२५ वाजता त्यांना हिंगोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील रस्त्यावर वैजनाथ दत्तराव शिंदे रा. बोडखी याने नळ जल मित्र निवडीचे प्रमाणपत्र न दिल्याच्या कारणावरून मिलिंद साबणे यांच्या गच्चीला पकडून खाली पाडून थापड बुक्याने मारहाण केली. तुम्ही जर मला प्रमाणपत्र दिले नाही तर जीवाने मारून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याने हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून वैजनाथ दत्तराव शिंदे याच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदिप मोदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेख हे करीत आहेत.

Related to this topic: