Hingoli Hostel: हिंगोलीतील शासकीय वस्तीगृहात मुला व मुलींच्या प्रवेशात घट झाली आहे. मुलींच्या १०० जागांपैकी केवळ ५० जागा भरल्या गेल्या, तर मुलांच्या वस्तीगृहात १०० पैकी ३८ जागा भरल्या.
इतर मागास मुलींच्या वसतिगृहात १०० जागा असताना केवळ ५० मुलींनी घेतला प्रवेश
इतर मागास मुलांसाठी १०० जागा असताना भरल्या केवळ ३८ जागा
हिंगोली (Hingoli Hostel) : येथील इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक कार्यालयाच्या वतीने चालविण्यात येणार्या इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वस्तीगृह व मुलांचे शासकीय वसतिगृहात सहाय्यक संचालक कार्यालयाचे दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (Hingoli Hostel) पाठीमागे असलेल्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनामध्ये अनेक कार्यालय असून इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक कार्यालयांचे हिंगोली शहराजवळ दोन मुला-मुलींचे शासकीय वस्तीगृहे अस्तित्वात आहेत. या इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक कार्यालयाच्या अधिकाराखाली मुलाचे व मुलीचे वस्तीगृह चालत आहे असून मुलीचे वस्तीगृहात शंभर मुलींची मान्यता असताना फक्त ५० मुली या शासकीय वस्तीगृहात राहून शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. तर मुलांचे शासकीय वस्तीगृहाला शंभर मुलांची मान्यता आहे परंतु ३८ विद्यार्थी या वस्तीगृहात राहून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या वसतीगृहात ६२ विद्यार्थ्यांची जागा रिक्त आहे. या सोबतच मुलींच्या १०० जागा असून ५० रिक्त आहेत.
शासन लाखो रुपये खर्च करून इतर मागास बहुजन कल्याण मुला मुलींचे वस्तीगृह चालवीत आहेत परंतु सन२० २४ -२५ वर्षातली स्थिती कायम राहिल्यास वसतिगृहाकडे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीचे अपुर्या सोयीमुळे वस्तीगृहात प्रवेश घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. उच्च दर्जाच्या सुविधा मिळाल्यास विद्यार्थी व विद्यार्थिनी शासकीय वस्तीगृहामध्ये राहून उच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतील परंतु याकडे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या विस्तार वस्तीगृहाकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान येणार्या शैक्षणिक वर्ष २०२५- २६ या वर्षाकरिता शासकीय वस्तीगृहात मुला व मुलींची संख्या वाढेल यासाठी शासनाकडून प्रयत्न करणे व जनजागृती करणे गरजेचे असल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी लक्ष देतीला का?
राज्य व केंद्र शासनातर्फे चालविल्या जाणार्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या या प्रयत्नांनी महसूल विभागात विविध योजनांचे सक्षमपणे कार्यान्वयन सुरू झाले आहे. (Hingoli Hostel) प्रशासनातील एक यंत्रणा नीट काम करत असतांना समाज कल्याण विभाग इतके अकार्यक्षम का झाले आहे, याचा तपास जिल्हाधिकारी घेतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेमके इतर मागासवर्गीय व मागासवर्गीय विद्यार्थी शासकीय वसतीगृहांकडे का पाठ फिरवित आहेत, याचे जिल्हाधिकार्यांनी कारण शोधावे, अशी मागणी होत आहे.