Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पथदिवे बंद

हिंगोलीतील महत्त्वाच्या रस्त्यांवर पथदिवे बंद; नागरिकांचा संताप

Hingoli street lights : हिंगोलीतील प्रमुख रस्त्यांवर पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी चालण्यासाठी अडचणी येत आहेत. यामुळे नागरिक संतप्त


हिंगोलीतील महत्त्वाच्या रस्त्यांवर पथदिवे बंद नागरिकांचा संताप

Hingoli street lights |

प्रशासकीय इमारतींच्या झगमगाटात मुख्य रस्ते मात्र काळोखात

हिंगोली (Hingoli street lights) : शहरातील ज्या रस्त्यावर न्याय मागण्यासाठी नागरिक येतात, जिथे जिल्ह्याचे सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी बसतात, त्याच रस्त्यांवर सध्या अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या बाजूला असलेले नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय आणि नवीन जिल्हा न्यायालय असलेल्या मुख्य रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी चाचपडत प्रवास करावा लागत आहे.

जिल्ह्याचा गाढा हाकणार्‍या प्रमुख कार्यालयाच्या रस्त्यावर अंधार

हिंगोलीतील नवीन जिल्हा न्यायालय आणि नवीन जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे जाणारा रस्ता अत्यंत सुसज्ज आणि प्रशस्त बनवण्यात आला आहे. या (Hingoli street lights) रस्त्यावर सुंदर दुभाजक असून पथदिव्यांचे खांबही उभे आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या खांबांवरील दिवे बंद असल्यामुळे संध्याकाळनंतर हा परिसर पूर्णपणे अंधारमय होतो. विशेष म्हणजे, याच रस्त्यावर नागरिक मोठ्या संख्येने 'मॉर्निंग' आणि 'इव्हिनिंग वॉक'साठी येतात. अंधारामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे.

केवळ जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालया समोरील रस्ताच नव्हे, तर जिल्हा परिषद आणि नगरपालिकेकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याचीही तीच अवस्था आहे. येथे लावण्यात आलेल्या पथदिव्यांपैकी 'एक चालू आणि एक बंद' असा प्रकार पाहायला मिळत आहे. प्रशासकीय इमारतींच्या चकाकीत बाहेरील रस्त्यांवरील हा अंधार प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

हिंगोलीतील अतिमहत्त्वाच्या रस्त्यांवरील पथदिवे गुल 

जिल्ह्याचा गाढा हाकणार्‍या प्रमुख कार्यालयाच्या (Hingoli street lights) रस्त्यावरच जर अंधार असेल तर सामान्य वस्त्यांमधील परिस्थिती काय असेल?' असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एका बाजूला रस्ते चकाचक दिसत असले तरी, मूलभूत सुविधेअभावी रात्रीच्या वेळी हा भाग असुरक्षित वाटू लागला आहे. जिल्हा प्रशासन, महावितरण आणि नगरपालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या मार्गावरील पथदिवे दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता याकडे संबंधित विभाग कधी लक्ष देतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

Related to this topic: