हिंगोली जलेश्वर तलाव

हिंगोलीतील जलेश्वर तलावाला लोखंडी कठड्यांचे कवच 

Hingoli Jaleshwar Lake: हिंगोलीतील जलेश्वर तलावाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी कठडे

हिंगोलीतील जलेश्वर तलावाला लोखंडी कठड्यांचे कवच 

Hingoli Jaleshwar Lake

पर्यटकांसाठी ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदू

हिंगोली (Hingoli Jaleshwar Lake) : हिंगोली शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या ऐतिहासिक जलेश्वर तलावाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. खोलीकरणानंतर तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, सुरक्षेच्या दृष्टीने तलावाभोवती मजबूत लोखंडी कठडे बसवण्यात आले आहेत. यामुळे तलाव पूर्णपणे संरक्षित झाला आहे. (Hingoli Jaleshwar Lake) जलेश्वर महादेव मंदिर परिसरात असलेल्या या तलावाच्या खोलीकरणाचे काम पूर्ण झाल्याने पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी व पाण्याचे संरक्षण करण्यासाठी पाण्यालगत लोखंडी कठडे उभारण्यात आले आहेत. हे कठडे केवळ सुरक्षितताच देत नाहीत, तर तलावाच्या सौंदर्यातही भर घालत आहेत. आता सर्व बाजूंनी तलावाचे मनोहारी दर्शन घेता येणार आहे.  
 
या (Hingoli Jaleshwar Lake) प्रकल्पांतर्गत तलावाच्या बाजूने रुंद रस्ता, वॉकिंग ट्रॅक, भव्य सभागृह आणि नागरिकांना बसण्यासाठी विशेष जागांची निर्मिती करण्यात येत आहे. तलावाच्या मध्यभागी महादेवाची भव्य मूर्ती उभारणे, संरक्षण भिंत बांधणे आणि गाळ काढण्याची कामेही योजनेत समाविष्ट आहेत. जलेश्वर मंदिर आणि सुशोभित तलावाचा नयनरम्य परिसर लवकरच हिंगोलीकरांसह बाहेरील पर्यटकांनाही आकर्षित करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी हे ठिकाण हक्काचे ठिकाण ठरणार आहे. शहराच्या मध्यभागी निसर्ग आणि अध्यात्माचा संगम घडवणारा हा (Hingoli Jaleshwar Lake) प्रकल्प हिंगोलीच्या सौंदर्यात नक्कीच मोलाची भर टाकेल.

संबंधित सामग्री

हिंगोलीत  ऐतिहासिक दसरा महोत्सवाची जय्यत तयारी; उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्याकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी

हिंगोलीत  ऐतिहासिक दसरा महोत्सवाची जय्यत तयारी; उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्याकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी

Hingoli Dussehra Festival: हिंगोली शहराची मोठी ओळख असलेल्या आणि तब्बल १७२ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाला परवापासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे.

Oct 08, 2026
हिंगोली ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 86 लाखांचा बेकायदेशीर फटाका साठा जप्त

हिंगोली ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 86 लाखांचा बेकायदेशीर फटाका साठा जप्त

Hingoli firecracker stockpile: शहरातील मारवाडी गल्ली विभागात 62 यांच्या निवासस्थानात फटाक्याच्या गोदामाला आग लागून तिघांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. या घटनेमुळे प्रशासनाने दिले निर्देश..

Oct 08, 2026
जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026