Hingoli beating case: हिंगोलीतील रस्सा भाकरी धाब्यावर मिस्त्रीला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संतोष ढोणे आणि प्रविण ढोणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंगोली ग्रामीण पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli beating case) : अकोला बायपासवर मिस्त्री कामाचे राहीलेले पैसे रस्सा भाकरी धाब्यावर मागण्यास गेलेल्या मिस्त्रीला मारहाण केल्याची घटना घडली. अकोला बायपास वरील संतोष ढोणे यांच्या रस्सा भाकरी धाब्यावर दौलत नामदेव पाईकराव हे मिस्त्री कामाचे राहीलेले पैसे मागण्या करीता ४ एप्रिलला दुपारी ४ च्या सुमारास गेले असता संतोष ढोणे याने दौलतच्या गच्चीला धरून जातीवाचक (Hingoli beating case) शिवीगाळ करून तुझे माझ्याकडे पैसे आहेत, पण मी देणार नाही असे म्हणुन अश्लिल भाषेत शिवीगाळ करून लोखंडी पंचने मारहाण केली.
पुन्हा येथे आल्यास येथेच मारून पुरून टाकतो, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या (Hingoli beating case) प्रकरणी ९ एप्रिलला हिंगोली ग्रामीण पोलिसात दौलत पाईकराव याने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष ढोणे, प्रविण ढोणे रा. खटकाळी बायपास हिंगोली या दोघावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे हे करीत आहेत.