Breaking News
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का
  • हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत बेपत्ता झालेल्या बालकाचा संशयास्पद मृत्यू
  • लग्नसोहळ्यात थरार! पुतण्याच्या हल्ल्यात काका-चुलत भावाचा खून
  • इराणची विनाशकारी योजना; गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनची कार्यालये उडवण्याची धमकी
  • IAS तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल '24 वेळा' बदली
  • नासाची आर्टेमिस-2 मोहीम; 54 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्र मोहिमेकडे
  • 'कूपर कॉनोली' ठरला पंजाब किंग्सच्या विजयाचा हिरो

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली बस समस्या

हिंगोली आगारात खिळखिळ्या बसमधून प्रवाशांना करावा लागतो प्रवास

Hingoli Bus Problem: हिंगोली आगारातील बसेस जर्जर व खराब अवस्थेत असल्याने प्रवाशांना अस्वस्थता अनुभवावी लागत आहे. नवीन ई-बसेसची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.


हिंगोली आगारात खिळखिळ्या बसमधून प्रवाशांना करावा लागतो प्रवास

Hingoli Bus Problem |

हिंगोली (Hingoli Bus Problem) : आगारात मागील अनेक दिवसांपासून जुन्या  व खिळखिळ्या झालेल्या बस धावत असल्याने  या बसेसमधून प्रवास करावा लागत आहे. या आगारात अद्यापही नव्याने ई-बसेस आल्याच नाहीत. उपलब्ध असलेल्या पुर्वीच्याच बसमधून प्रवास करावा लागत असल्याने  मध्येच या गाड्या बंद पडणे, पंम्चर होणे हे प्रकार घडत असल्याने प्रवाशातून नाराजी वाढली आहे.

हिंगोली आगारात (Hingoli Bus Problem) ५९ बसेस आहेत. यामध्ये १५ बसेस नव्याने उपलब्ध झाल्या  आहेत. ४४ बसेस जुन्याच आहेत. नवीन बसेसची मागणी हिंगोली आगाराने केली. परंतु अद्यापही ह्या बसेस उपलब्ध झालेल्या  नाहीत. त्यामुळे  आहे त्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. यामध्ये बसच्या सीटा व्यवस्थीत नसणे, तुटलेल्या  खिडक्या, पावसाळ्यात  गळणार्‍या  बसेस आहेत. यातूनच प्रवाशांना प्रवास करावा  लागतो. काही बसेस जुन्या  झाल्याने  त्यामध्ये बंद पडतात. काहींना  धक्का  मारावा लागतो. तर काही जागेवरच पंम्चर होत आहेत. ६ एप्रिल सोमवार  रोजी हिंगोली आगारातून धावणार्‍या एका बसमध्ये प्रवाशी  बसले  असताना या बसचे चाक जागेवरच बसले. त्यानंतर प्रवाशांना  खाली उतरवून त्याची दुरुस्ती केल्यानंतरच हि बस मार्गस्त झाली. त्यामुळे   प्रवाशांना बराच वेळ ताटकळत  बसण्याची वेळ आली.

दरम्यान हिंगोली आगाराने  नवीन बसेसची मागणी करूनही अद्याप या (Hingoli Bus Problem) आगाराला  नवीन बसेस उपलब्ध झाल्या नाहीत.  केवळ १५ बस हिंगोली  आगारामध्ये दाखल झाल्या  आहेत. या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडल्या जातात. मात्र इतर  उपलब्ध असलेल्या ४४ बसेस  या जुन्याच आहेत. आता या बसेस बदलून नवीन बसेस आगाराला मिळाव्यात अपेक्षा प्रवाशातून व्यक्त केली जात आहे. येथील आगारातून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची ये-जा  असते. सकाळपासून सायंकाळपर्यंत बसस्थानकावर कायमच गर्दी असते. त्यामुळे हिंगोली आगाराला  उत्पन्न देखील चांगले आहे. तसेच जिल्ह्याचे ठिकाण  असल्याने येथे कायम प्रवाशी मोठ्या  संख्येने असतात. याचा विचार  करून हिंगोली आगाराला नवीन बसेस देणे गरजेचे आहे.

हिंगोली आगाराने ई-बसेसची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. मात्र  अद्यापही या बसेस उपलब्ध झाल्या नाहीत. तसेच नवीन  बस देखील मिळाव्यात अशीही  मागणी केलेली आहे. त्यामुळे आता ई-बससह नवीन (Hingoli Bus Problem) बसेस उपलब्ध होतील अशी अपेक्षा हिंगोली आगारासह प्रवाशांना  आहे.

Related to this topic: