Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली टँकर बंद आंदोलन

हिंगोलीत एक दिवस टँकर बंद आंदोलन; दरवाढीची मागणी

Hingoli Tanker Bandh: हिंगोलीत टँकर चालकांनी दरवाढीच्या मागणीसाठी एक दिवस टँकर बंद आंदोलन केले. यामुळे शहरात पाण्याच्या पुरवठ्यात खंड पडल्याने नागरिकांमध्ये तारांबळ उडाली.


हिंगोलीत एक दिवस टँकर बंद आंदोलन दरवाढीची मागणी

Hingoli Tanker Bandh |

हिंगोली (Hingoli Tanker Bandh) : शहरामधील निर्जळीमुळे अनेक नागरीक खासगी टँकरव्दारे पाणी उपलब्ध करून घेत असतात. टँकरचालकाना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने दरवाढीच्या मागणीसाठी बुधवारी एक दिवसासाठी टँकर बंद आंदोलन केल्याने अनेकांची पाण्या वाचून तारांबळ उडाली.

हिंगोली शहरामध्ये सिध्देश्वर धरणातून पाणी पुरवठा केला जातो. कधी अवकाळी पाऊस तर कधी तांत्रिक कारणावरून अधून मधून पाणी पुरवठा खंडीत होतो. हिंगोली शहरात जवळपास १० ते ११ दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेक नागरीक खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून गरज भागवत असतात. यापूर्वी हिंगोली शहराजवळील काही अंतरावर टँकर चालकांना पाणी उपलब्ध होत होते.

त्यासाठी ज्या ठिकाणाहून टँकर भरून घेतले जाते त्या ठिकाणी मोठ्या (Hingoli Tanker Bandh) टँकरसाठी ३०० रुपये तर छोट्या टँकर करीता १०० रुपये मोजावे लागत होते. अशा परिस्थितीत शहरात मोठे टँकर ६०० ते ७०० रुपये आणि छोटे टँकर २०० ते २५० रुपये दराने नागरीकांनी उपलब्ध करून दिले जात होते. उन्हाळा तीव्र झाल्याने अनेक ठिकाणची पाणी पातळी खालावली. त्यामुळे टँकर चालकांना आता जवळच्या अंतरावर पाणी उपलब्ध होत नसल्याने जवळपास ८ ते १० कि. मी. अंतरावर जाऊन पाणी घ्यावे लागत आहे.

सदर ठिकाणचेही दर वाढविल्याने त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे (Hingoli Tanker Bandh) टँकर चालकांना मोठ्या टँकरसाठी ८०० ते १००० हजार रुपये आणि लहान टँकरकरीता ३०० ते ३५० दरवाढ अपेक्षित आहे. यामुळे हिंगोली शहरासह परिसरातील टँकर चालकांनी २९ एप्रिल बुधवार रोजी दिवसभर टँकर बंद ठेवल्याने निर्जळी दरम्यान पाण्यासाठी अनेकांची तारांबळ उडाली.

Related to this topic: