Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली जवान मृत्यू

हिंगोली राज्य राखीव पोलिस दलातील जवानाचा अपघातात मृत्यू

Hingoli jawan death: राज्य राखीव पोलिस दलातील जवान सिध्दांत खिल्लारे यांचा अकोला बायपासवर अपघातात मृत्यू झाला. हिंगोलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.


हिंगोली राज्य राखीव पोलिस दलातील जवानाचा अपघातात मृत्यू

Hingoli jawan death |

Hingoli jawan death राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ मधील सिध्दांत खिल्लारे या जवानाचा अकोला बायपासवर रविवारी अपघातात मृत्यू झाला. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हिंगोली राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ मध्ये सिध्दांत खिल्लारे (३३) हे पोलिस हवालदार म्हणुन कार्यरत होते. सन २०१२ मध्ये राखीव दलात रुजू झाल्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावले. २६ एप्रिल रोजी सिध्दांत खिल्लारे हे दुपारच्या सुमारास काही कामानिमित्त अकोला बायपास येथे आले असता  अनोळखी वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना तात्काळ हिंगोलीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी ४ वाजता त्यांचा मृत्यू (Hingoli jawan death) झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. अपघातस्थळी हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलिस उपनिरीक्षक राहुल घुले व जमादार बाळासाहेब खोडवे यांनी भेट दिली.

सिध्दांत खिल्लारे यांच्यावर हिंगोलीतील आदर्श महाविद्यालय परिसरातील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी (Hingoli jawan death) त्यांना शोक सलामी देण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई असा परिवार आहे. हिंगोली जिल्हा पोलिस दलातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ज्योती खिल्लारे  यांचा तो मुलगा होत.

Related to this topic: