Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भिडेवाडा चित्ररथ

हिंगोली शहरातही होणार ऐतिहासिक भिडेवाडा चित्ररथाचे आगमन

Bhidewada Chitrarath: हिंगोली शहरात लवकरच ऐतिहासिक भिडेवाडा चित्ररथाचे आगमन होणार आहे, ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा प्रसार होणार आहे.


हिंगोली शहरातही होणार ऐतिहासिक भिडेवाडा चित्ररथाचे आगमन

Bhidewada Chitrarath |

हिंगोली (Bhidewada Chitrarath) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचावेत, यासाठी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे मंत्री छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आणि समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीरभाऊ भुजबळ, आमदार पंकजभाऊ भुजबळ यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भीडेवाडा येथे सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचा भिडेवाडा चित्ररथाचे लवकरच हिंगोली शहरात आगमन होणार आहे.  

सदरील चित्ररथाचे आगमण झाल्यानंतर आतिषबाजी फटाक्यांची केली जाणार आहे. हा (Bhidewada Chitrarath) रथ म्हणजे केवळ एक प्रतीकृती नाही तर शिक्षण, समता, सामाजिक जागरूकतेचा गीत आहे. मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी लढा दिला, त्या महान कार्याची आठवण करून देणारा जिवंत प्रेरणा रथ आहे. रथ यात्रेच्या स्वागतासाठी सर्व समता सैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंदू लव्हाळे यांनी केले आहे,

यात्रेच्या अनुषंगाने समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष वनिताताई गुंजकर, जयश्री सातव, प्रा. डॉ. सुखदेव बलखंडे, कैलास भुजंगळे सर, प्रा. डॉ. सचिन हाटकर, प्रा.डॉ. सुधाकर भालेराव, शेख अमिना, ज्योती दिघडे, ज्योती धुळे, चंद्रशेखर उबाळे रमेश सानप वसंता वाघ, ज्ञानेश्वर नागुलकर, प्रकाश गिराम, डॉक्टर नागोराव जांबुतकर, प्रल्हादराव चोपडे,अशोक भुसारे, अक्षय लव्हाळे, चंदू वाघ,अनिल मस्के, वामनराव पवार, आनंदराव गिराम आदी जय्यत तयारी करीत आहेत.

Related to this topic: