Breaking News
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का
  • हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत बेपत्ता झालेल्या बालकाचा संशयास्पद मृत्यू
  • लग्नसोहळ्यात थरार! पुतण्याच्या हल्ल्यात काका-चुलत भावाचा खून
  • इराणची विनाशकारी योजना; गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनची कार्यालये उडवण्याची धमकी
  • IAS तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल '24 वेळा' बदली
  • नासाची आर्टेमिस-2 मोहीम; 54 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्र मोहिमेकडे
  • 'कूपर कॉनोली' ठरला पंजाब किंग्सच्या विजयाचा हिरो

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली नगरपालिका अतिक्रमण

हिंगोलीत नगरपालिकेचे अतिक्रमण हटाव मोहीम सुरु

Hingoli Municipal Encroachment: हिंगोली शहरात नगरपालिकेने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. तहसील कार्यालय ते अग्रसेन महाराज चौकापर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले.


हिंगोलीत नगरपालिकेचे अतिक्रमण हटाव मोहीम सुरु

Hingoli Municipal Encroachment |

हिंगोली तहसील कार्यालय ते अग्रसेन चौकातील रस्त्यावरील अतिक्रमण हटविले

हिंगोली (Hingoli Municipal Encroachment) : शहरात नगर पालिकेच्या वतीने रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी संबंधीतांला सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही अतिक्रमण काढण्यात आले नसल्याने ७ एप्रिल मंगळवार रोजी नगर पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेत तहसील कार्यालय ते अग्रसेन महाराज चौकापर्यंत रस्त्यावर झालेले
अतिक्रमण काढण्यात आले.

हिंगोली शहरात मुख्य रस्त्यावर काही भागात अतिक्रमण झाले आहे. हे (Hingoli Municipal Encroachment) अतिक्रमण काढण्यासाठी नगर पालिकेच्या वतीने अतिक्रमण धारकांना सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु काही जणांनी रस्त्यावरचे अतिक्रमण काढलेच नाही. त्यानंतर मंगळवारी नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. हिंगोली तहसील कार्यालय ते अग्रसेन महाराज चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे नगर रचनाकार प्रविण मुहेकर, नगर अभियंता प्रतीक नाईक, उपमुख्याधिकारी साबळे, सचिन पवार, स्वच्छता निरीक्षक आकाश देशमुख, पंडीत मस्के, इंजि. गजानन काळे तसेच बाळू बांगर आदींची उपस्थिती होती.

दरम्यान शहरातील इतरही
ठिकाणच्या रस्त्यावर झालेले अतिक्रमण (Hingoli Municipal Encroachment) हटविण्यात येणार आहे. ही मोहीम शहरात सुरुच राहणार आहे. त्यामुळे रस्त्यावर झालेले अतिक्रमण धारकांनी काढून घ्यावे अशा सुचना नगर पालिकेच्या वतीने अतिक्रमण धारकांना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी अतिक्रमण हटविल्यानंतर बुधवारी देखील हि मोहीम नगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related to this topic: