Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जलजीवन मिशन

हिंगोलीत अंधारवाडीत जलजीवन मिशनचे पाणी उपलब्ध

Jaljeevan Mission: हिंगोली तालुक्यातील अंधारवाडीमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून विहिरीत पाणी सोडण्यात आले आहे, ज्यामुळे उन्हाळ्यात गावकर्‍यांना पाणी नियमित मिळणार आहे.


हिंगोलीत अंधारवाडीत जलजीवन मिशनचे पाणी उपलब्ध

Jaljeevan Mission |

हिंगोली (Jaljeevan Mission) : तालुक्यातील अंधारवाडी येथे जलजीवन मिशनचे पाणी गावात उपलब्ध झाले असून ते  विहिरीत सोडण्यात आले आहे. यामुळे  गावकर्‍यांना उन्हाळ्यामध्ये पाणी नियमित मिळणार  आहे.

हिंगोली तालुक्यातील अंधारवाडी येथे  जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) अंतर्गत पारोळा तलावाजवळ विहिर खोदण्यात आली आहे. या विहिरीला पाणी देखील लागले आहे. पारोळा ते अंधारवाडी असे ७ किलो मिटर अंतर जलवाहिन्या टाकून अंधारवाडी गावातील विहिरीमध्ये सध्या हे पाणी सोडण्यात आले आहे. मागील काही दिवसापासून गावात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मोठ्या  प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर हे पाणी उपलब्ध  झाले आहे. आता विहिरीत पाणी सोडून तेथून गावकर्‍यांना ते उपलब्ध  होणार आहे.यासाठी गणेश लुंगे यांच्या  पुढाकारातून पाणी उपलब्ध झाले  आहे. यासाठी शेख  गणी, शेख जलील, शेख मुनाफ, भाऊराव कोरडे, शेख  शकील, मा.सरपंच शेख वाहेद, पा.पु.सेवक वैभव उन्हाळे, मारोती इंगळे आदींनी  प्रयत्न केले.

Related to this topic: