Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

साधना सप्ताहात  हिंगोली जिल्हा परिषद अहवाल आल्याने सीईओ चा सत्कार

हिंगोली येथील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत मागील महिन्यात कर्मचाऱ्यांना साधना सप्ताहात आयगॉटचे प्रशिक्षण देण्यात आले.


साधना सप्ताहात  हिंगोली जिल्हा परिषद अहवाल आल्याने सीईओ चा सत्कार 

Hingoli Zilla Parishad |

हिंगोली (Hingoli Zilla Parishad) : हिंगोली येथील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत मागील महिन्यात कर्मचाऱ्यांना साधना सप्ताहात आयगॉटचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये 95 टक्के कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतल्याने हिंगोली जिल्हा परिषद राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

राज्यातील सर्वच जिल्हा परिषद, जिल्हा कचेरी यासह पंचायत समिती मध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेताना येणाऱ्या आवाहनाला सामोरे जात प्रशिक्षण पूर्ण केले. त्यामुळे हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात अव्वल कामगिरी बजावली आहे. त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सोमवारी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सामान्य अतिरिक्त सीईओ डॉ. सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, यांच्यासह विभागातील पी. व्ही. घंटाराम, उदय देशपांडे, प्रफुल खंदारे, दत्ता वाघमारे, संदीप अन्नदाते, प्रवीण काळबांडे, सिद्दीकी, परिहार, अनिकेत सोनटक्के, जी. एम. बोथीकर, पवार, सातोनकर, मस्के, तुकाराम हमाने, विवेक दळवी, आदींची उपस्थिती होती.