Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोलीत पाणी टंचाईचा उद्रेक; पालकमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न, महिलांनी फोडली मडकी

हिंगोली शहरातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर आज नागरिकांचा संताप उफाळून आला.


हिंगोलीत पाणी टंचाईचा उद्रेक पालकमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न महिलांनी फोडली मडकी

Hingoli Water Crisis |

हिंगोली (Hingoli Water Crisis) : हिंगोली शहरातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर आज नागरिकांचा संताप उफाळून आला. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा सुरू असताना शिवसेना उबाठा शेतकरी सेना प्रदेश संघटक (मराठवाडा) वसीम अहमद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला-पुरुषांनी त्यांचा वाहन ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र ताफा न थांबल्याने संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच हातातील मडकी फोडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे. आठ-आठ दिवसांनी केवळ एकदाच आणि तेही अपुरे पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. या पार्श्वभूमीवर एक मे रोजी पालकमंत्री झिरवाळ हिंगोली दौऱ्यावर असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना निवेदन देण्यासाठी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना उबाठा शेतकरी सेना प्रदेश संघटक (मराठवाडा) वसीम अहमद देशमुख म्हणाले, "वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाला जाग येत नाही. पाण्यासाठी आया-बहिणींना वणवण करावी लागत आहे. पालकमंत्र्यांनी किमान आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, हीच अपेक्षा होती. पण ताफा न थांबवल्याने आमचा नाईलाज झाला." यावेळी महिलांनी 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

​​​​​​​

दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष घातले नाही पपरंतुजोपर्यंत प्रत्यक्षात पाणी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शिवसेना उबाठा शेतकरी सेना प्रदेश संघटक (मराठवाडा) वसीम अहमद देशमुख यांनी दिला आहे. या घटनेमुळे हिंगोलीतील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या आंदोलन प्रसंगी हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांच्यासह इतरांनी चोग पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Related to this topic: