Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

'पोलीस काका-दीदी' उपक्रम

हिंगोलीत महिला-बालकांच्या सुरक्षेसाठी 'पोलीस काका-दीदी' उपक्रम

'Police Kaka-Didi' initiative: हिंगोली पोलीस विभागाने महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी 'पोलीस काका-दीदी' उपक्रम सुरू केला. या अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.


हिंगोलीत महिला-बालकांच्या सुरक्षेसाठी पोलीस काका-दीदी उपक्रम

'Police Kaka-Didi' initiative |

 

प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथके तैनात

हिंगोली ('Police Kaka-Didi' initiative) : पोलीस महासंचालक कार्यालयाच्या सूचनेनुसार हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला व बालकांच्या सुरक्षा संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत 'पोलीस काका', 'पोलीस दीदी', 'विशेष पोलीस बाल पथक' व 'बडी कॉप' या उपक्रमांबाबत कायदेशीर तरतुदी व पोलिसांच्या भूमिकेवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. 

दिशा संस्था, अमरावतीचे संस्थापक प्रविण खांडपासळे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आता 'पोलीस काका', 'पोलीस दीदी', विशेष बाल पथक व बडी कॉपची पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके शाळा, हॉस्टेल, महिला कामाच्या ठिकाणी नियमित भेट देऊन तक्रारी जाणून घेणार आहेत.

महिला व बालकांच्या ('Police Kaka-Didi' initiative) तक्रारींसाठी या ठिकाणी 'संवाद पेटी' म्हणजेच तक्रार पेटी ठेवली जाणार आहे. विद्यार्थी व बालकांनी आपल्या तक्रारी या पेटीत टाकाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच रात्री कामावरून घरी जाणाऱ्या महिलांना असुरक्षित वाटल्यास तात्काळ डायल ११२ वर किंवा जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस त्यांना सुरक्षित घरी पोहोचवतील, अशी ग्वाही देण्यात आली. या कार्यशाळेस प्र. पोलीस उपअधीक्षक दत्ता केंद्रे, पोनि मोहन भोसले, सपोनि प्रेमलता जगताप तसेच सर्व ठाणेदार, शाखा प्रमुख व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

Related to this topic: