Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जवळाबाजार पेट्रोल पंप

पेट्रोल पंपावरील अनागोंदीला जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत

Hingoli Petrol pump:


पेट्रोल पंपावरील अनागोंदीला जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत 

Hingoli Petrol pump |

 

कॅन मध्ये डिझेल बंद करण्याची मागणी
बड्या धेंडांना मध्यरात्री डिझेलचे वाटप

जवळाबाजार (Hingoli Petrol pump) : पेट्रोल पंप चालकांनी डिझेल तुटवण्याचे आभासी चित्र निर्माण केल्यामुळे रोज पंपावर डिझेल साठी होणाऱ्या गर्दीमुळे निर्माण झालेल्या अनागोंदी कारभाराला जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे.

सध्या शेतीची खरीप हंगामाची पूर्व मशागत मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे ट्रॅक्टर चालकांना डिझेलचा मोठा तुटवडा जाणवत आहे. रोज ज्या पंपावर डिझेल उपलब्ध आहे तिथे रोजंदारी मजुर व शेतकरी यांना रांगेमध्ये उभे टाकून नंबर लावावा लागत आहे. डिझेल कॅन मध्ये भरून घेण्यासाठी उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना अन्न पाण्याविना दिवस काढावा लागत असताना पेट्रोल पंप चालकांकडून साधी पाणी सुद्धा उपलब्ध करून दिले जात नाही. वाहन उद्योगातील प्रस्थापितांना पेट्रोल पंप चालक मध्यरात्री लागेल तेवढे इंधन उपलब्ध करून देत असल्यामुळे डिझेलचा तुटवडा असल्याचे आभासी चित्र निर्माण केल्या जात आहे.

बहुतांश ठिकाणी वाहनधारकांनी कॅन मध्ये डिझेल नेऊन घरी नेऊन मोठा स्टॉक केला असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे कॅन मध्ये इंधन न देता प्रत्यक्ष वाहनांमध्ये भरून देण्याची मागणी वाहनधारकातून केली जात आहे. रांगेमध्ये दिवसभर नंबर लावून सुद्धा पेट्रोल पंप चालकांकडून अत्यल्प डिझेल देण्यात येत असल्यामुळे बहुतांश पेट्रोल पंपावर हाणामारीचे प्रसंग घडत आहेत. काही पेट्रोल पंपावर डिझेल विक्री बंद पाडण्यासाठी पेट्रोल पंप चालक काही मद्यपी तैनात करीत असल्याचा संशय आहे.

Related to this topic: