Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली व्यक्ती मृत्यू

हिंगोलीत छतावर पडुन गंभीर झालेल्या व्यक्तीचा मृत्यू

Hingoli Person Death:


हिंगोलीत छतावर पडुन गंभीर झालेल्या व्यक्तीचा मृत्यू 

Hingoli Person Death |

हिंगोली (Hingoli Person Death) : शहरातील भोईपुरा भागातील 44 वर्षीय व्यक्ती छतावर पडून गंभीर जखमी झाली असता नांदेड रुग्णालयात नेत असताना गुरुवारी रस्त्यात मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की हिंगोली शहरातील भोईपुरा भागातील अजय मुरलीधर बोधने (44) हे हिंगोलीतील एका खाजगी पतसंस्थेमध्ये कार्यरत होते. 12 मे मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास छतावर गेले असताना अचानक पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

त्यामुळे त्यांना तात्काळ हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. (Hingoli Person Death) प्रकृती गंभीर झाल्यामुळे 14 मे गुरुवार रोजी नांदेड येथील रुग्णालयात नेण्यात आले होते त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी एक मुलगी, एक भाऊ भावजय, बहीण, भाऊजी असा परिवार आहे. मयत अजय बोधने याचे शवविच्छेदन हिंगोलीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतदेहावर सायंकाळी हिंगोलीतील कयाधू नदीच्या तीरावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.

Related to this topic: